Share

‘शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलन करणार’; रामदेव बाबांचा सरकारला इशारा

रामदेव बाबा यांनी Gen Z आंदोलनाचे कौतुक करत शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.

Published On: 

Ramdev Baba speaks on Gen Z

Ramdev Baba : योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी अलीकडेच ‘जनरेशन झेड’ (Gen Z) आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. त्यांनी ‘जनरेशन झेड’च्या सक्रियतेचे कौतुक केले असले तरी, परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्यासारख्या (पेपर लीक) मुद्द्यांवर चिंताही व्यक्त केली.

परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आपण मोठे आंदोलन (Protest) छेडू, असा कडक इशारा त्यांनी सरकारला दिला. ‘जनरेशन झेड’मधील अनेकजण चांगली कामे करत असले, तरी काहीजण हिंसाचारात सहभागी असल्याचे त्यांनी मान्य केले. रामदेव बाबांनी यावर भर दिला की, “‘जनरेशन झेड’कडे एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. कारण तरुणाईचा एक मोठा गट उत्कृष्ट काम करत असतानाच, दुसरा मोठा गट मात्र भरकटत चालला आहे. वाईट सवयींच्या आहारी जात आहे.”

Ramdev Baba speaks on Gen Z

रामदेव बाबांनी पुढे बोलताना नमूद केले की, ‘जनरेशन झेड’मधील अनेकजण एकाच वेळी अनेक प्रेमसंबंध ठेवतात आणि काहीजण मद्यपान व धूम्रपानाच्या व्यसनाधीनतेकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांनी तरुणांना अशा सवयींपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

“काही लोक केवळ राजकीय फायद्यासाठी देशाची नकारात्मक प्रतिमा रंगवतात, जणू काही देशात काहीच चांगले चाललेले नाही आणि काही जण याच्या माध्यमातूनच पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघत आहेत, जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचे असेल तर थोडी वाट बघा.” असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या पार्श्वभूमीवर, शिक्षण पद्धतीत सुधारणा न झाल्यास आपण मोठे आंदोलन उभे करू, अशी ठाम घोषणा करत रामदेव बाबांनी सरकारला इशारा दिला. आता जेनझींनंतर सरकारपुढे रामदेव बाबांचे आव्हान असणार आहे.

‘जनरेशन झेड’मधील व्यक्तींचे एकापेक्षा जास्त जोडीदारांशी प्रेमसंबंध असण्याबाबतच्या त्यांच्या विधानाने नवा वाद निर्माण केला असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला त्यांनी त्यांच्या सक्रियतेचे समर्थन केले, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या जीवनशैलीबाबत त्यांना समज देतानाही ते दिसले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही