Share

‘BJP-RSS ने आम्हाला शहाणपणा शिकवू नये’; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंदे मातरम वादावर स्पष्टीकरण देत सोनिया गांधींवरील आरोप फेटाळले आणि भाजपवर टीका केली.

Published On: 

Harshvardhan Sapkal on Vande Mataram row

दिल्ली : भाजप गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या काळात १३ वेळा भाषणे केली आहेत. एवढे असून पण त्यांना ध चा मा करणे त्यांच्याकडून सुटत नाही. पंतप्रधान यांच्या भाषणात काही दम नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केली.

त्याचबरोबर, आर.पी. सिंग यांनी एका व्हिडिओद्वारे केलेल्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले. या आरोपांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोनिया गांधी या ‘वंदे मातरम’ गायनामुळे नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी काँग्रेस मुख्यालयात ते गाणे थांबवण्यास कार्यकर्त्यांना सांगितले होते.

Harshvardhan Sapkal on Vande Mataram row

त्या व्हिडिओमधील दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांना बराच वेळ उभे राहताना शारीरिक त्रास होतो आणि सोनिया गांधी त्या संदर्भातच सूचना देत होत्या. खर्गे साहेबांना उभे राहताना त्रास होत असल्याचे आपण यापूर्वीही पाहिले आहे. त्यामुळे, ‘वंदे मातरम’च्या मुद्द्याचा अशा प्रकारे गैरफायदा घेणे भाजपला शोभत नाही, असे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरवात वंदे मातरम ने होते. वंदे मातरम हा काँग्रेसचा मंत्र आहे. त्यामुळे भाजप, आरआरएस (RSS), विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभेने आम्हाला शहाणपणा शिकवू नये.” असा संताप सपकाळ यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. या कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर ‘वंदे मातरम’ हे पूर्ण गीत गाण्यास सोनिया गांधींनी आक्षेप घेतला होता, असे आरोप करण्यात आले. भाजपने यावरून पक्षावर टीका केली, परंतु काँग्रेसने स्पष्ट केले की ‘वंदे मातरम’ पूर्ण गायले गेले आणि त्यात कोणीही व्यत्यय आणला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही