Share

यशस्वी जैस्वालचा अनोखा विक्रम: सलग ३० कसोटी, ३० वेगवेगळी मैदाने; थेट सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी!

यशस्वी जैस्वालने कारकिर्दीतील पहिले ३० कसोटी सामने वेगवेगळ्या मैदानांवर खेळण्याचा दुर्मिळ विक्रम स्वतःच्या नावावर केला असून, त्याने थेट सचिन तेंडुलकर आणि संजय मांजरेकर यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

Published On: 

Yashasvi Jaiswal playing test cricket in Indian jersey celebrating milestone

Yashasvi Jaiswal: ३० कसोटी सामने आणि ३० वेगवेगळी मैदाने… ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना? पण टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वालने हा अनोखा विक्रम खऱ्या अर्थाने स्वतःच्या नावावर केलाय.

श्रीलंकेविरुद्ध गॉल स्टेडियमवर तो कारकिर्दीतला ३० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. आणि याचसोबत त्याने एक असा रेकॉर्ड बनवला, जो याआधी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात फक्त सचिन तेंडुलकर आणि संजय मांजरेकर यांनाच जमता आला होता.

Yashasvi Jaiswal चा ऐतिहासिक विक्रम, थेट सचिनच्या पंगतीत!

जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध रोसो (Roseau) येथून त्याने कसोटी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत तो एकाही मैदानावर सलग दुसरा कसोटी सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया असा प्रवास करत तो आता श्रीलंकेत पोहोचलाय.

त्याची आकडेवारीही थक्क करणारी आहे. ३० सामन्यांच्या ५५ डावांमध्ये त्याने तब्बल २५६७ धावा कुटल्यात. यात ७ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश असून, नाबाद २१४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याची फलंदाजीची सरासरी ४८.४३ इतकी जबरदस्त आहे.

दुसरीकडे, गॉल कसोटीत मात्र त्याची खेळी दुर्दैवीरित्या संपुष्टात आली. तो ३२ धावांवर उत्तम खेळत होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण धाव घेताना गोलंदाजाशी त्याची धडक झाली आणि केएल राहुलसोबत उडालेल्या गोंधळामुळे त्याला धावबाद (Run Out) होऊन माघारी परतावं लागलं.

कसोटी क्रिकेटमधील त्याची ही तिसरी वेळ आहे, जेव्हा तो धावबाद झालाय. याआधी तो २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (८२ धावांवर) आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध (१७५ धावांवर) धावबाद झाला होता.

यशस्वी जैस्वालचे ३० कसोटी सामने आणि कामगिरी:

कसोटीमैदानप्रतिस्पर्धीकामगिरी (धावा)
रोसो (Roseau)वेस्ट इंडिज१७१
पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडिज५७, ३८
सेंच्युरियनदक्षिण आफ्रिका१७, ५
केपटाऊनदक्षिण आफ्रिका०, २८
हैदराबादइंग्लंड८०, १५
विशाखापट्टणमइंग्लंड२०९, १७
राजकोटइंग्लंड१०, २१४*
रांचीइंग्लंड७३, ३७
धर्मशालाइंग्लंड५७
१०चेन्नईबांगलादेश५६, १०
११कानपूरबांगलादेश७२, ५१
१२बंगळुरून्यूझीलंड१३, ३५
१३पुणेन्यूझीलंड३०, ७७
१४वानखेडेन्यूझीलंड३०, ५
१५पर्थऑस्ट्रेलिया०, १६१
१६अ‍ॅडलेडऑस्ट्रेलिया०, २४
१७ब्रिस्बेनऑस्ट्रेलिया४, ४*
१८मेलबर्नऑस्ट्रेलिया८२, ८४
१९सिडनीऑस्ट्रेलिया१०, २२
२०लीड्सइंग्लंड१०१, ४२
२१बर्मिंगहॅमइंग्लंड८७, २८
२२लॉर्ड्सइंग्लंड१३, ०
२३मँचेस्टरइंग्लंड५८, ०
२४द ओव्हलइंग्लंड२, ११८
२५अहमदाबादवेस्ट इंडिज३६
२६दिल्लीवेस्ट इंडिज१७५, ८
२७ईडन गार्डन्सदक्षिण आफ्रिका१२, ०
२८गुवाहाटीदक्षिण आफ्रिका५८, १३
२९न्यू चंदीगडअफगाणिस्तान२४
३०गॉलश्रीलंका३२

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही