Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सक्रियपणे काम केले आहे.
ओबीसी समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका कायम आहे आणि भविष्यातही ती तशीच राहील. शनिवारी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सामंत यांनी हे विधान केले.
यावेळी उदय सामंत यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. यांना दोघांनाही आमचे सांगणे आहे की, कोणाचेही आरक्षण कमी करून आम्ही दुसऱ्याला आरक्षण देणार नाही. दोन्ही समाजांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
Uday Samant on Manoj Jarange Maratha reservation
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आव्हान देशातल्या भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या विषयाला विरोधक वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जात आहेत, त्यापेक्षा या विधेयकाला सहकार्य करावे आणि राजकीय महिला भगिनींना न्याय मिळवून द्यावा. यावरून राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा या विधेयकाच्यादृष्टीने सकारात्मक विचार केला पाहिजे, असे उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.
उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावरही निशाणा साधला. आदित्य ठाकरे औद्योगिक प्रकल्पांना भेटी देण्यासाठी घराबाहेर पडत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. चाकणमधील उद्योजकांना भेटण्याची त्यांना इच्छा झाली, ही एक चांगली बाब आहे,” अशी टिप्पणी सामंत यांनी केली.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावरही उदय सामंत यांनी टीका केली. ते माझ्या विमानात बसणार असतील तर मी पण त्यांना विमानात घेतो. एवढी जेलसी कशाला असली पाहिजे. एवढी जेलसी असू नये, अंबादास दानवे यांना मी मांडीवर बसवायला देखील तयार आहे. राजकारणात एवढी जेलसी आणि चिडचिड करुन चालत नाही.
जर अंबादास दानवे यांना माझ्या दौऱ्याची अडचण नसेल, तर त्यांनी येऊन माझ्यासोबत सामील व्हावे. त्यांनी आपण नक्की काय करत आहोत हे स्पष्ट करावे; त्यांचे स्वतःचे राजकीय महत्त्व संपले आहे. जे माझ्यावर टीका करतात, त्यांनी आधी २०२९ च्या निवडणुकीसाठी स्वतःचे मतदारसंघ सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्यांनी आधी त्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे आणि मगच माझ्यावर टीका करावी, असे उदय सामंत यांनी म्हटले.
“ही केवळ बोलून दाखवण्याची गोष्ट नाही, शिंदे साहेब काय करू शकतात, हे आपण चार वर्षांपूर्वीच पाहिले आहे. रोज लोक आमच्या पक्षात सामील होत आहेत. काँग्रेसचे १८ नगरसेवक आणि एका नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आमच्यात सामील झाले आहेत, ही एकनाथ शिंदे साहेबांची किमया आहे. मी स्वतःही शिवसेनेत काम करतो.
एकनाथ शिंदे यांनी उच्च पदावर बसावे, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनीही उच्च पदावर बसावे, अशी भाजपचीही इच्छा असेल. आमच्या नेत्याविषयी आम्हाला वाटलं त्यात गैर काय आहे, असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला.
एखाद्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे म्हणजे काजव्याने स्वतःची तुलना सूर्याशी करण्यासारखे आहे. काजव्यांनी असे मानायचे की मी सूर्य आहे. गणेश नाईक कुठल्या शर्यतीमध्ये होते, या हा माझ्यासाठी गौण भाग आहे.
एनडीए (NDA) मध्ये एकनाथ शिंदे हे तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. साहेबांवर टीका करणाऱ्या त्यांच्या अनेक नातेवाईकांचा निवडणुकीत पराभव झाला. याउलट, एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांना कधीही पराभव पत्करावा लागलेला नाही, असे उदय सामंत यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत’; गोपीनाथ मुंडेंबाबत चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट
- सावधान! कावळ्याला दिलेला त्रास पडू शकतो महागात; माणसाचा चेहरा लक्षात ठेवण्याबाबत वैज्ञानिकांचा मोठा गौप्यस्फोट
- ‘मेलोनी समजून मिठी मारली नाही ना?’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











