Share

अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंच्या उपोषणाचा मंडप रात्रीतून हटवला; नेमकं काय घडलं?

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप आणि स्टेज ग्रामस्थ व कोअर कमिटीच्या निर्णयानंतर रात्रीतून हटवण्यात आला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil protest mandap removed in Antarwali Sarati Jalna

जालना, 27 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उभारण्यात आलेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा मंडप आणि स्टेज रात्रीतून हटवण्यात आला आहे. ग्रामस्थ आणि सरपंचांच्या निर्णयानंतर हा मंडप काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गावचे सरपंच आणि मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीमध्ये संवाद झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या २८ तारखेला ग्रामसभेची बैठक होणार आहे. या बैठकीत मंडपावरून संभाव्य विरोध होऊ नये, यासाठी आधीच हा मंडप काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साधारण दीड वर्षांपूर्वी काही ग्रामस्थांनी या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. मागील काही दिवसांपासून गावात या मंडपावरून कुजबूज सुरू होती. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीचे स्थानिक सदस्य आणि ग्रामस्थांनी मिळून रात्रीतून हा मंडप हटवला.

मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी याच मंडपातून आंदोलन सुरू केले होते. या काळात अनेकदा उपोषण स्थगित झाले, मात्र हा मंडप कधीही काढण्यात आला नव्हता. शेवटच्या वेळी हे आपले अंतिम आणि निर्णायक उपोषण असल्याचे जरांगे म्हणाले होते.

ज्या पद्धतीने हा मंडप हटवण्यात आला आहे, त्यावरून मनोज जरांगे यापुढे किमान अंतरवाली सराटीमध्ये तरी आंदोलन करणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता या संपूर्ण घडामोडींवर स्वतः मनोज जरांगे पाटील काय अधिकृत भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

गावचे सरपंच आणि मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीमध्ये झालेल्या संवादानंतर ग्रामस्थ व सरपंचांच्या निर्णयाने हा मंडप रात्रीतून काढण्यात आला. २८ तारखेला होणाऱ्या ग्रामसभेच्या बैठकीत मंडपावरून संभाव्य विरोध टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही