छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर: छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) अंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी ते चर्चेत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या ‘डिफेंडर’ कारमधूनच गावात पोहोचले. मात्र, अंतरवालीत येताच त्यांनी या कारच्या मालकाला फोन करून बोलावून घेतले आणि गाडी त्यांना परत केली.
जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना एका मराठा बांधवाने त्यांना ही कार दिली होती. सुभाष भोसले (रा. चिकमहूद, ता. सांगोला) असे या डिफेंडर कारच्या मालकाचे नाव असून त्यांचा सराफा व्यवसाय आणि शेती आहे. जरांगे यांच्या सांगण्यावरून भोसले यांनी अंतरवालीत येऊन आपली गाडी परत नेली आहे.
काही दिवसांपूर्वी भोसले यांच्या कोलकता येथील व्यवसायावर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्याची चर्चा होती. त्यामुळे ही गाडी आणि तिचे मालक पुन्हा चर्चेत आले होते. डिफेंडर कारवरून होणाऱ्या टीकेवर जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. माझ्यावर जळणाऱ्यांची संख्या खूप असून मी डिफेंडरमध्ये फिरतोय म्हणून गैरसमज पसरवले जात असल्याचे ते म्हणाले होते.
टीकाकारांना सुनावताना जरांगे म्हणाले होते की, यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का? मला कोणत्याही गाडीत बसायचा अधिकार आहे. माझ्या समाजाची लेकरं मला लाल दिव्याच्या गाडीत बसलेली बघायची आहेत. दरम्यान, अंतरवालीत पोहोचल्यानंतर जरांगेंनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला आणि कोणाबद्दलही मनात राग न ठेवण्याचे आवाहन केले.
आपण जसे गाऱ्हाणे पंढरपुरात मांडतो, तसे लोकांच्या वेदना ऐकून सोडवण्यासाठी आपले अंतरवाली गाव असल्याचे जरांगे म्हणाले. मी जिवंत असेपर्यंत अंतरवालीला डाग लागू देणार नाही. मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर मलाही आता येथे करमत नाही. आपले मायलेकरासारखे घट्ट नाते झाले आहे, जे कधीही तुटू शकत नाही, अशी भावनिक साद त्यांनी घातली.
📌 महत्वाच्या बातम्या
- दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची परीक्षा फी माफ; महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय
- ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार अन् कोयत्याने वार
- ‘खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकाच्या आरोपांना ओंकार भोजनेचं थेट उत्तर; म्हणाला, ‘ऐनवेळी नियोजन…’
Quick Answers
अंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे पाटील यांनी कारचे मालक सुभाष भोसले यांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांना गाडी परत केली.
जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना एका मराठा बांधवाने त्यांना ही कार दिली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









