पाण्यासाठी शंभर फोन करावे लागले; बीडमध्ये भर कार्यक्रमात तरुणाने खासदार बजरंग सोनवणेंना विचारला जाब

गेवराई तालुक्यातील नारायणवाडीत एका कार्यक्रमादरम्यान तरुणाने खासदार बजरंग सोनवणेंना पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नावरून थेट जाब विचारत स्थानिक आमदारांवरही टीका केली.

Published On: 

Bajrang Sonawane on Santosh Deshmukh murder case Walmik Karad

गेवराई, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना विकासकामांच्या मुद्द्यावरून स्थानिक तरुणाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. गेवराई तालुक्यातील नारायणवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना भरत व्यासपीठावर एका तरुणाने त्यांना थेट जाब विचारला.

या तरुणाने संताप व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘बजरंग बप्पा, आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे, पण पाण्यासाठी मला तुम्हाला शंभर फोन करावे लागले. आमच्या गावच्या रस्त्यांवर गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत, मग आमचे प्रश्न आम्ही कुणापुढे मांडायचे?’ असा थेट सवाल या तरुणाने भर कार्यक्रमात विचारला.

खासदारांना जाब विचारताना या तरुणाने स्थानिक आमदारांवरही नाराजी व्यक्त केली. आपले गेवराईचे आमदार हे आपण गेवराईचे आमदार आहोत की बीडचे, हेच विसरून गेले असल्याची टीका त्याने केली. दरम्यान, या तरुणाने उपस्थित केलेले सर्व प्रश्न आणि त्याचे म्हणणे खासदार बजरंग सोनवणे यांनी शांतपणे ऐकून घेतले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही