मुंबई, 30 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २६५ दुष्काळी तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam) विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेची फी माफ करण्यात आली आहे. याबाबत बोर्डाकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
२५ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने विशेष सवलती लागू केल्या आहेत. या अंतर्गत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्याच्या सूचना बोर्डाने दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांकडून आधी परीक्षा शुल्क घेऊन नंतर ते परत (रिफंड) करण्याऐवजी, सुरुवातीलाच शुल्क न घेण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली होती. यावर चर्चा झाल्यानंतर शिक्षण मंडळाने (Maharashtra Board) परीक्षा फी न घेण्याचा निर्णय जाहीर केला.
पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याची कार्यवाही करावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, संबंधित विभागातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीने सूचना द्याव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार अन् कोयत्याने वार
- ‘खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकाच्या आरोपांना ओंकार भोजनेचं थेट उत्तर; म्हणाला, ‘ऐनवेळी नियोजन…’
- निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून मविआत मतभेद? राऊत, पवारांसह काँग्रेसची वेगळी भूमिका
Quick Answers
महाराष्ट्र बोर्डाने राज्यातील २६५ दुष्काळी तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेची फी माफ केली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत लागू आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









