राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली; शरद पवार गटाच्या आमदाराचा मोठा दावा

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचा दावा आमदार अभिजीत पाटील यांनी केला असून सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत बैठक झाली.

Published On: 

Parth Pawar meets Sharad Pawar

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला आता वेग आला आहे. शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी याबाबत मोठा दावा करत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे म्हटले आहे. अजित पवार असतानाच दोन्ही गट एकत्र येण्याचे निश्चित झाले होते, असे विधान करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक दावा केला होता. अजित पवार असते तर १२ फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले असते, असे तटकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आमदार अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार कुटुंबाने एकत्र येणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून राजकारणामुळे दुरावलेले कुटुंब पुन्हा एकत्र आल्यास आनंदच होईल, असे ते म्हणाले. विलीनीकरणाच्या प्रक्रियेत आमचीही मते जाणून घेतली जातील, असा दावा त्यांनी केला.

खासदार सुप्रिया सुळे यांची विलीनीकरणाबाबत नेमकी काय भूमिका आहे, हे त्यांची भेट घेतल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीतील संसद भवन परिसरात सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.

सुळे आणि पटेल यांच्यात सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच खऱ्या अर्थाने विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही