Share

‘खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकाच्या आरोपांना ओंकार भोजनेचं थेट उत्तर; म्हणाला, ‘ऐनवेळी नियोजन…’

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केलेल्या आरोपांवर ओंकार भोजनेने मौन सोडले असून, तारखा आणि नियोजनाच्या गोंधळामुळे प्रमोशनला उपस्थित राहता न आल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

Published On: 

Onkar Bhojane On Director Milind Kawde

प्रतिनिधी, 29 सप्टेंबर: ‘अफरातफरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केलेल्या आरोपांवर अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) याने मौन सोडले आहे. ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओंकारने सर्व आरोप फेटाळून लावले असून, तारखांच्या आणि नियोजनाच्या गोंधळामुळे चित्रपटाच्या प्रमोशनला उपस्थित राहता आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दिग्दर्शक मिलिंद कवडे (Milind Kavde) यांनी ओंकार खोटारडा असून तो प्रमोशनसाठी वेळ देत नसल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना ओंकार म्हणाला की, तो पहिल्यापासूनच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरच्या (EP) संपर्कात आहे. शूटिंग किंवा रिडिंगच्या वेळी मोबाईल फ्लाईट मोडवर असल्यामुळे कधीकधी कॉल घेता येत नाहीत, पण आपण नेहमी कॉलबॅक करतो, असे त्याने स्पष्ट केले.

Onkar Bhojane On Milind Kawde

प्रमोशनला दांडी मारल्याच्या आरोपावर ओंकारने सांगितले की, नुकतेच पुण्यात सोमवारी मुलाखतींचे नियोजन झाले होते. त्यासाठी त्याने टेलिव्हिजनच्या कामातून वेळ काढला होता. मात्र, शनिवारच्या संध्याकाळी अचानक सोमवारचे सर्व नियोजन रद्द झाल्याचा मेसेज त्याला आला.

ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाच्या अनुपस्थितीबाबत ओंकारने सांगितले की, २१ सप्टेंबरला त्याने वेळ दिला होता. मात्र, ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम २२ सप्टेंबरला मुंबईत ठरला. त्यावेळी पुण्यात आपले आधीच ठरलेले शो असल्यामुळे मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य झाले नाही. आपण मुंबईत असतो तर नक्कीच मॅनेज केले असते, अशी कल्पनाही त्याने दिली होती.

‘अफरातफरी’ चित्रपटाचे शूटिंग दोन-अडीच वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. आता चित्रपट प्रदर्शित होत असताना आपल्या नव्या कामांच्या कमिटमेंट्स पाळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ओंकारने आवर्जून सांगितले. ऐनवेळी नियोजन बदलल्यामुळे आपल्याला उपस्थित राहणे शक्य झाले नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकार खोटारडा असून तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेळ देत नसल्याचा आरोप केला होता.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही