ठाणे, 30 सप्टेंबर: ठाण्यातील घोडबंदर परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. पूर्णेकर त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूर्णेकर यांचा मृत्यू झाला आहे.
हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्या डोक्यात आणि मानेवर कोयत्याने गंभीर वार केले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस हत्येमागील कारणाचा आणि हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा भागाचे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे भाऊ होते. ते शिवसेना (ठाकरे गटाचे) मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत होते. नशामुक्तीच्या उपक्रमांसह पोलिसांच्या विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. तसेच, कॉक्रोज जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी दिल्लीत जाऊन सहभाग घेतला होता.
या हत्येच्या घटनेनंतर मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका पदाधिकाऱ्याची कार्यालयात घुसून हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ठाण्यात संतापाचे वातावरण आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकाच्या आरोपांना ओंकार भोजनेचं थेट उत्तर; म्हणाला, ‘ऐनवेळी नियोजन…’
- निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून मविआत मतभेद? राऊत, पवारांसह काँग्रेसची वेगळी भूमिका
- “धर्म, सण घरापुरताच मर्यादित ठेवावा”; डीजेविरोधी लढ्याला सुमित राघवनचा पाठिंबा, विद्यानंद बापटांचा सत्कार
Quick Answers
प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यातील घोडबंदर परिसरातील त्यांच्या कार्यालयात हत्या करण्यात आली. त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात व मानेवर कोयत्याने वार करण्यात आले.
प्रदीप पूर्णेकर हे शिवसेना (ठाकरे गटाचे) मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत होते.
या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









