Share

RBI चा बडगा! IndusInd Bank वर मोठा दंड, तुमचं खातं तर नाही ना?

आरबीआयने ठेवींवरील व्याजदराचे नियम मोडल्याने इंडसइंड बँकेला ५९.२० लाखांचा दंड ठोठावला असून इतर ३ कंपन्यांवरही कारवाई केली आहे.

Published On: 

RBI penalty news IndusInd bank with Reserve Bank of India

तुमचं खातं इंडसइंड बँकेत आहे का? असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता थेट ॲक्शन मोडवर येत इंडसइंड बँकेला चांगलाच दणका दिलाय.

आरबीआयने इंडसइंड बँकेला तब्बल ५९.२० लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. बँकेने ठेवींवरील व्याजदर आणि काही महत्त्वाचे नियम धाब्यावर बसवल्याने हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. विशेष म्हणजे, या बँकेसोबतच आणखी तीन वित्तीय कंपन्यांवरही दंडाची कुऱ्हाड कोसळली आहे.

IndusInd Bank RBI Penalty: आरबीआयने दंड का ठोठावला?

इंडसइंड बँकेने काही करंट अकाउंटमधील (चालू खाती) जमा रकमेवर ग्राहकांना परस्पर व्याज दिलं. पण, चालू खात्यावर व्याज देण्याचे आरबीआयचे नियम अगदी वेगळे आहेत. याशिवाय, बँकेने ‘सिंथेटिक सिक्युरिटायझेशन’सारख्या गोष्टी केल्या, ज्या नियमात बसत नव्हत्या. यामुळेच आरबीआयने हे कडक पाऊल उचललं.

दुसरीकडे… फक्त इंडसइंड बँकच नाही, तर इतर फायनान्स कंपन्यांनाही रडारवर घेण्यात आलंय. ‘फ्यूजन फायनान्स’ने केवायसी (KYC) नियमांचं पालन न केल्याने त्यांना २.७ लाखांचा दंड बसलाय. तर, ‘नॉर्थन आर्क कॅपिटल’ला ग्राहकांच्या तक्रारी लपवल्याने आणि माहिती न दिल्याने ६.२ लाखांचा दंड लावण्यात आलाय. यासोबतच, ‘मुथूट एमक्रेड’ने एनपीए खात्यांबाबत चुकीची माहिती दिल्याने त्यांच्यावरही ३.१ लाखांची कारवाई झालीय. ३१ मार्च २०२५ च्या आर्थिक स्थितीची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पण ग्राहकांनो, घाबरण्याचं कारण नाही! बँकेने नियम मोडल्याने ही कारवाई झालीय. त्यामुळेच… तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि या दंडाचा तुमच्या खात्यावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकांचे आणि ग्राहकांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही