Share

“जे भोळे राहील त्याला मित्रपक्षच गडप करतील”; संजय गायकवाड यांचे मोठे वक्तव्य

संजय गायकवाड यांनी भाजपवर निशाणा साधत ‘भोळे राहिलात तर मित्रपक्ष गडप करतील’, असा इशारा दिला.

Published On: 

Sanjay Gaikwad targets BJP

‘महायुती’मधील भाजपवर (BJP) शिवसेनेच्या शिंदे गटाचा आता विश्वास उरलेला नाही, असे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. निमंत्रण असूनही त्यांनी तिथे न जाणे पसंत केले.

जळगावमधील एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपवर कडक शब्दांत टीका केली होती. आपण जर भोळे राहिलो, तर भाजप आपल्याला ‘खाऊन टाकेल’, असे ते म्हणाले होते. आता बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही याच भावना व्यक्त करत भाजपबद्दल अविश्वास दर्शवला आहे. यामुळे महायुतीमध्ये नक्की काय चालले आहे, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Gaikwad targets BJP

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी असे म्हटले होते की, शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) शरद पवार यांचा हक्क आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी ठामपणे सांगितले की, “त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुका शिवसेनेच्या बॅनरखाली आणि ‘धनुष्य-बाण’ चिन्हावर लढवल्या होत्या.”

गायकवाड यांनी नमूद केले की, “जनतेने त्यांना विधानसभेतील दुसरा सर्वात मोठा पक्ष आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार असल्याने केंद्रामध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्हाला कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. आम्हाला जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे.”

संजय राऊत यांच्यावर टीका

त्यांच्या ६० आमदारांना मतदान करणाऱ्या लाखो लोकांनी ‘शेण खाल्ले’ असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? किंवा ज्या नगरपालिकेमध्ये कोट्यवधी लोकांनी आमच्या लोकांना मतदान केले. ४० नगराध्यक्ष महाराष्ट्रात निवडून आले. जवळपास ३०० नगरसेवक आमचे निवडून आले, त्यांनी शेण खाल्ल म्हणायचे आहे का? संजय राऊत यांना कुणावर काय बोलावे याची अक्कल नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला निवडून दिले, असा दावा गायकवाड यांनी केला.

“मित्रपक्ष आपल्याला गडप करेल”

जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी एक धाडसी विधान केले. “जर मी भोळा राहिलो, तर भाजप मला खाऊन टाकेल.” त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली. माझ्या तोंडातून काहीही निघते आणि बोललो तर हे टीव्ही वाले काही पण दाखवतात. त्यामुळे मी आता सांभाळून बोलतो, असे मिष्कील वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते.

यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील जे बोलले ते बरोबर आहे. आज कोणीही शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही. जे भोळे राहील त्याला मित्रपक्षच गडप करतील, असे मोठे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही