Share

रोहित शेट्टीच्या घरावर मध्यरात्री ‘फायरिंग’; ५ राउंड झाडले, मुंबई पोलिसांची १२ पथकं मागावर!

रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाला. अज्ञातांनी ५ राउंड फायर केले असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

Published On: 

Rohit Shetty House Firing: 'सिंघम'च्या दिग्दर्शकावर ५ राउंड फायर!

🕒 1 min read

‘सिंघम’ आणि ‘सूर्यवंशी’ सारख्या चित्रपटांतून गुंडांना धडा शिकवणारे पोलिस आपण पडद्यावर पाहतो, पण खऱ्या आयुष्यात त्याच ‘सिंघम’च्या निर्मात्याला टार्गेट केल्याने मुंबई हादरली आहे. सलमान खान प्रकरण ताजं असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) घरावर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जुहूसारख्या हाय-प्रोफाईल भागात मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे.

शनिवारी मध्यरात्री (1 फेब्रुवारी) जुहू येथील रोहित शेट्टीच्या राहत्या इमारतीवर हा धक्कादायक हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत इमारतीवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी तब्बल ५ राउंड फायर केले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी झाले नाही. गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी घरात उपस्थित होते की नाही, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Rohit Shetty House Firing

घटनेचे गांभीर्य ओळखत मुंबई पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येत तपास सुरू केला आहे. अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपींच्या अटकेसाठी क्राइम ब्रँचने १२ विशेष पथकं (Special Teams) तयार केली आहेत. सध्या रोहित शेट्टीच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरातील CCTV फुटेज स्कॅन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या घटनेने २०२४ मध्ये अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबाराच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यावेळी लॉरेन्स बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आता रोहित शेट्टीच्या घरावर झालेला हल्ला हा खंडणीसाठी आहे की यामागे काही वैयक्तिक वाद आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत. अंडरवर्ल्ड पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याच्या चर्चांना यामुळे उधाण आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही