Share

टीकाकारांना सडेतोड उत्तर! मालिका गाजवल्यावर सूर्यकुमार यादवने सगळा राग काढला म्हणाला…,

टीकाकारांना बॅटने उत्तर दिल्यावर सूर्यकुमार यादवने मौन सोडले. न्यूझीलंडविरुद्ध ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरल्यानंतर त्याने मनातील खदखद व्यक्त केली.

Published On: 

Suryakumar Yadav: 'मी फॉर्ममध्येच होतो', मालिकावीर सूर्याचा खुलासा!

‘सूर्य’ मावळलाय की काय? अशी टीका काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात सुरू होती. पण जेव्हा हा ‘सूर्य’ तळपतो, तेव्हा समोरच्या संघाची राखरांगोळी होते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बॅटने टीकाकारांची बोलती बंद केल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्यांदाच आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो सूर्यकुमार यादव! त्याने 5 सामन्यांत तब्बल 242 धावा कुटल्या आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा किताब पटकावला. सामना संपल्यानंतर बोलताना सूर्याने स्पष्ट शब्दांत टीकाकारांना सुनावले.

Suryakumar Yadav Statement

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सूर्या म्हणाला, “मी या क्षणाची खूप वाट पाहिली. गेल्या वर्षभरापासून माझ्याबाबत गोष्टी ठीक घडत नव्हत्या. पण, मी आउट ऑफ फॉर्म नव्हतो, फक्त माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या.” सूर्याच्या या एका वाक्याने त्याने आपल्यावरील सर्व आरोपांना पूर्णविराम दिला आहे.

तो पुढे म्हणाला की, “मी माझ्या ‘रुटीन’वर ठाम राहिलो. हेच एका खेळाडूचं आयुष्य असतं. क्रिकेटच नाही, तर कोणत्याही करिअरमध्ये असे चढ-उतार येतातच. मागील काही आठवडे मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवला, ज्याचा मला खूप फायदा झाला.”

आता सर्वांचे लक्ष 2026 च्या टी-20 वर्ल्डकपवर आहे. याबद्दल बोलताना सूर्याने टीम इंडियाचा ‘फ्यूचर प्लॅन’ सांगितला. “आम्ही आता मुंबईला जाणार आहोत, तिथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळू. मागील चुकांमधून शिकून आम्ही वर्ल्डकप मोहीम सुरू करू,” असा विश्वास त्याने व्यक्त केला.

सूर्यकुमारच्या या ‘कडक’ कमबॅकमुळे भारतीय चाहत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत, हे मात्र नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही