‘हे एक षडयंत्र..बरोबर ना?’ अजित पवारांच्या निधनावर राखी सावंतचा दावा, दुसरीकडे सुनेत्रा पवारांबाबत मोठी अपडेट!

अजित पवारांच्या निधनावर राखी सावंतने केला ‘षडयंत्रा’चा दावा; दुसरीकडे सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री.

Published On: 

Rakhi Sawant on Ajit Pawar: 'हे षडयंत्र...'; राखीचा दावा अन् सुनेत्रा पवार शपथ घेणार

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक धक्कादायक घटना घडत आहेत. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि दुःख अजूनही कायम असताना, आता ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने (Rakhi Sawant) केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२८ जानेवारीला बारामतीत लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना राखी सावंतने मात्र पापाराझींसमोर एक वेगळाच संशय व्यक्त केला आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी आली असताना राखी म्हणाली, “या घटनेमागे राजकारण नाही, पण हे एक षडयंत्र (Conspiracy) आहे. ते आमचे आवडते नेते होते. पण हे षडयंत्र आहे, बरोबर ना?”

Rakhi Sawant on Ajit Pawar

राखीच्या या ‘षडयंत्र’च्या थिअरीपेक्षा तिच्या कपड्यांचीच चर्चा सोशल मीडियावर जास्त रंगली आहे. श्रद्धांजली वाहताना तिने मरून रंगाचा अत्यंत ‘Bold’ ड्रेस परिधान केला होता. दुःखाच्या प्रसंगी असा पेहराव केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच Troll केलं आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एकीकडे राखीची चर्चा सुरू असतानाच, राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अजितदादांच्या रिक्त जागी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची वर्णी लागणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे, शपथविधीनंतर त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

आज दुपारी २ वाजता विधानभवनात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, अजितदादांकडे असलेलं अर्थखातं (Finance) मात्र सुनेत्रा पवारांना दिलं जाणार नाही. त्यांच्याकडे इतर खात्यांची जबाबदारी सोपवली जाईल, अशी माहिती आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही