Share

IND vs PAK : महामुकाबल्याआधी ‘क्रिकेटच्या देवा’ची एन्ट्री; व्हिडीओ कॉलवर सचिन तेंडुलकरांचा टीम इंडियाला ‘हा’ गुरुमंत्र!

भारत-पाक महामुकाबल्याआधी सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या खेळाडूंना दिला यशाचा कानमंत्र; सेमीफायनलसाठी समीकरण काय? वाचा सविस्तर.

Published On: 

IND vs PAK U19 WC: सचिनचा टीम इंडियाला गुरुमंत्र; फोटो व्हायरल

🕒 1 min read

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हटलं की फक्त क्रिकेट उरत नाही, ती एक भावना असते. उद्या होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्याआधी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये वातावरण कसं असेल, याची कल्पना करा… पण आता टेन्शन घेण्याचं कारण नाही, कारण खुद्द ‘क्रिकेटचा देव’ टीम इंडियाच्या मदतीला धावून आलाय!

अंडर-19 वर्ल्डकप 2026 आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. रविवारी (१ फेब्रुवारी) सुपर-6 फेरीतील सर्वात मोठ्या लढतीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. या ‘करो या मरो’ स्थितीतील सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) टीम इंडियाच्या युवा खेळाडूंशी व्हिडीओ कॉलवरून थेट संवाद साधला. बीसीसीआयने (BCCI) या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

IND vs PAK U19 WC

महिन्याभरापूर्वीच आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. त्या पराभवाचं उट्टे काढण्याची आणि हिशोब चुकता करण्याची हीच योग्य वेळ आहे. अशा तणावाच्या सामन्यात “फक्त खेळावर लक्ष केंद्रित करा आणि डोकं शांत ठेवा,” हा मोलाचा सल्ला सचिनने दिला.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सचिनने केवळ तांत्रिक बाबींवर चर्चा केली नाही, तर मानसिक कणखरता, शिस्त आणि यश मिळाल्यानंतरही ‘जमिनीशी जोडलेलं राहणं’ किती महत्त्वाचं आहे, याचे धडे वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेसारख्या युवा स्टार्सना दिले.

सध्याच्या गुणतालिकेत भारताचं पारडं जड आहे. टीम इंडियाने ३ पैकी ३ सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. उद्या पाकिस्तानला हरवताच भारत सेमीफायनलमध्ये (Semifinal) धडक मारेल. दुसरीकडे, पाकिस्तानसाठी हा रस्ता अत्यंत बिकट आहे. त्यांना फक्त जिंकून चालणार नाही, तर त्यांचा नेट रनरेट (Net Run Rate) भारतापेक्षा चांगला करावा लागेल, अन्यथा जिंकूनही त्यांना स्पर्धेबाहेर जावं लागू शकतं.

हा थरार उद्या दुपारी १ वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे रंगणार असून Star Sports आणि JioHotstar वर लाईव्ह पाहता येईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या