Share

भारत-पाकिस्तान सामन्याआधी ICC ची मोठी खेळी; ‘या’ दोघांच्या हातात असणार हाय-व्होल्टेज सामन्याची सूत्रं!

भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यासाठी ICC ने अंपायर्सची घोषणा केली आहे; कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर असणार सामन्याची मोठी जबाबदारी.

Published On: 

IND vs PAK T20 WC: भारत-पाक मॅचसाठी अंपायर जाहीर; ICC ची मोठी घोषणा

क्रिकेटच्या मैदानात जेव्हा भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) आमनेसामने येतात, तेव्हा जगभरातील चाहत्यांचे श्वास रोखलेले असतात. येत्या १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पुन्हा एकदा असाच थरार रंगणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील या सर्वात मोठ्या ‘महामुकाबल्या’साठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने एक मोठी घोषणा केली असून, सामन्याची धुरा दोन अत्यंत अनुभवी ‘दिग्गजां’कडे सोपवली आहे.

टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2026) ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच रेफरींची यादी जाहीर केली आहे. सर्वांच लक्ष लागून होतं ते भारत-पाकिस्तान सामन्यातील अंपायर्सकडे. या हाय-प्रेशर गेमसाठी आयसीसीने कोणताही धोका न पत्करता कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) या दोन अनुभवी अंपायर्सची नियुक्ती केली आहे.

IND vs PAK T20 WC

मैदानावर क्षणाक्षणाला बदलणारं वातावरण आणि खेळाडूंचा तणाव सांभाळण्यात हे दोन्ही अंपायर्स वाकबगार आहेत. विशेष म्हणजे, कुमार धर्मसेना यांनी २०१६ आणि २०२२ च्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये अंपायरिंग केली आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव या सामन्यात कामी येईल, अशी आयसीसीची धारणा आहे.

दुसरीकडे, भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेविरुद्ध (India vs USA) करणार आहे. या सामन्यासाठी पॉल रायफल आणि रॉड टकर हे ऑन-फील्ड अंपायर म्हणून काम पाहतील.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एकूण २४ अंपायर्स आणि ६ मॅच रेफरी काम पाहणार आहेत. यात भारताकडून नितीन मेनन आणि मॅच रेफरी म्हणून जवागल श्रीनाथ यांचाही समावेश आहे. सुपर-८ फेरीचे अंपायर्स नंतर जाहीर केले जातील, पण सध्या सगळ्यांच्या नजरा १५ फेब्रुवारीच्या त्या ‘हाय-व्होल्टेज’ लढतीवर खिळल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही