Share

१५ वर्षांच्या वैभवला थेट रोहित-विराटसोबत खेळण्याची संधी? बीसीसीआयच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बीसीसीआयने मोठी प्रतिक्रिया दिली असून, टीम इंडियातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.

Published On: 

BCCI official devajit saikia talks about Vaibhav Suryavanshi future in Team India

🕒 1 min read

मुंबई – वयाच्या १५ व्या वर्षी तुम्ही-आम्ही काय करत होतो? बहुधा शाळेच्या किंवा दहावीच्या अभ्यासाचं टेन्शन घेत असू. पण बिहारच्या एका १५ वर्षांच्या पोराने थेट आयपीएलच्या मंचावर भल्याभल्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडलाय.

आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने धावांचा पाऊस पाडलाय. त्याच्या या स्फोटक फलंदाजीची दखल आता थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतली असून, लवकरच हा पठ्ठ्या टीम इंडियात दिसणार का, या चर्चांना उधाण आलंय.

Vaibhav Suryavanshi Team India entry BCCI official statement

आयपीएल स्पर्धेच्या सांगता समारोपानंतर बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी वैभववर भरभरून स्तुतिसुमने उधळली आहेत. सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबी संघाचं कौतुक करत असतानाच, त्यांनी वैभवच्या भविष्याबाबत एक मोठं विधान केलं आहे.

सैकिया यांनी स्पष्ट केलं की, “वैभव हा अत्यंत प्रतिभावान आणि उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. या पोराला क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करेल.”

वैभवने या हंगामात तब्बल २३७.३० च्या अफाट स्ट्राईक रेटने फलंदाजी करत गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. त्याने हंगामात सर्वाधिक ७७६ धावा कुटत मानाची ‘ऑरेंज कॅप’ स्वतःच्या नावावर केली आहे. यापूर्वी २०२५ मध्ये २३ वर्षीय साई सुदर्शनने सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता होण्याचा मान मिळवला होता, तो विक्रम आता वैभवने मोडीत काढलाय.

त्यामुळेच आता ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’चा मानकरी ठरलेला हा युवा स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांसोबत टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत कधी दिसणार, याचीच उत्सुकता तमाम क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!