🕒 1 min read
मुंबई – टीव्हीवर एखादा मोठा स्टार हसत हसत एखादं प्रॉडक्ट विकतो आणि आपणही डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतो. पण तेच प्रॉडक्ट जर बोगस निघालं तर तुम्ही काय कराल?
आता असाच भूलथापा देणाऱ्या जाहिरातींचा बाजार लवकरच बंद होणार आहे. कारण राज्याचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) पदभार स्वीकारताच जोरदार कारवाईला सुरुवात केलीय. आता केवळ बोगस उत्पादकच नाही, तर त्या खोट्या प्रॉडक्ट्सची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवरही थेट कारवाई केली जाणार आहे.
Tukaram Mundhe FDA Action
मुंढे यांनी २५ मे रोजी या पदाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांची नेहमीची ॲक्शन मोड वाली स्टाईल पाहायला मिळाली. अवैध गुटखा आणि भेसळयुक्त पदार्थांवर त्यांनी थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तब्बल २८ दुकाने सील करण्यात आली आहेत. तर ३३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि अगदी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी टाकलेल्या या धाडींमुळे भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, टीव्ही आणि वर्तमानपत्रांमधील जाहिरातींचा मुद्दा आता मुंढेंनी रडारवर घेतलाय. अनेकदा मोठ्या ब्रँडच्या नावाखाली ग्राहकांना अक्षरशः चुना लावला जातो. अवास्तव फायदे सांगून लोकांना उत्पादनं विकत घ्यायला भाग पाडलं जातं.
त्यामुळेच आता या प्रक्रियेत कुणाचीच गय केली जाणार नाही. जाहिरातदार, उत्पादक आणि त्या जाहिरातीत मोठ्या थाटात झळकणारे ब्रँड ॲम्बेसेडर अशा सर्वांचीच जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी एकही जाहिरात यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशाराच प्रशासनाने दिलाय.
भ्रष्ट यंत्रणेला वठणीवर आणणाऱ्या मुंढेंच्या या नव्या मोहिमेचं सध्या सर्वसामान्य नागरिकांकडून मोठं कौतुक होत आहे. त्यामुळे येत्या काळात अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर कोणता बडा स्टार येतोय, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- १५ व्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने असा काय गौप्यस्फोट केला की दिग्गजांचेही डोळे उघडले?
- सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला बाहेर?
- धनंजय मुंडेंकडून भररस्त्यात गोळीबार? धनंजय देशमुखांच्या आरोपाने राजकारणात मोठी खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












