Share

धनंजय मुंडेंकडून भररस्त्यात गोळीबार? धनंजय देशमुखांच्या आरोपाने राजकारणात मोठी खळबळ!

आमदार धनंजय मुंडे यांनी गाडी आडवी लावून हवेत गोळीबार केल्याचा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला असून बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

Dhananjay Munde Firing Allegations by Dhananjay Deshmukh in Beed

बीड– राज्याचे माजी मंत्री आणि नेते थेट भररस्त्यात कुणाची गाडी आडवी लावून गोळीबार करू शकतात का? बीडच्या राजकारणात सध्या याच एका प्रश्नाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी थेट आमदार धनंजय मुंडे यांच्यावरच हा गंभीर आरोप केला आहे. मुंडेंनी गाडी आडवी लावत हवेत दोन राऊंड फायर केल्याचा दावा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हा सगळा प्रकार समोर आला तो एका खोट्या गुन्ह्याच्या नाट्यानंतर. काही दिवसांपूर्वीच समाधान खिंडकर याने धनंजय देशमुख यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तक्रार दिली होती.

Dhananjay Munde Firing Allegations

खिंडकरच्या तक्रारीनुसार देशमुखांनी अंगरक्षकाचे पिस्तूल काढून डोक्यावर लावले होते. बीड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तातडीने पावले उचलत थेट ३०७ चा गुन्हाही दाखल केला होता. पण या तपासात पुढे एक मोठा ट्विस्ट आला.

आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल सात तास या प्रकरणाची सखोल चौकशी केली. घटनास्थळावरील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब तपासले, तेव्हा असा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचं उघड झालं. प्राथमिक चौकशीतच पोलिसांनी हा गुन्हा खोटा असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर येत धनंजय देशमुखांनी खरा बॉम्ब फोडला आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच सवाल उभे केले.

पोलिसांनी ४८ गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून माझ्यावर शहानिशा न करता खोटा गुन्हा दाखल केला, असा संताप त्यांनी व्यक्त केला. याच वेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर थेट निशाणा साधला. मुंडेंनी स्वतः माझ्यासमोर गाडी आडवी लावली आणि हवेत दोन फायर केले, असा मोठा गौप्यस्फोट देशमुखांनी केला आहे. या आरोपामुळे बीडचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

आपण या प्रकरणी रीतसर फिर्याद देण्यासाठी आलो असून मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुखांनी केली आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाला आता कोणतं नवं वळण लागतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install