Share

वैभव सूर्यवंशी भडकला: मैदानावर श्रीलंकन खेळाडूंशी राडा, पण ड्रेसिंग रुममध्ये नेमकं कोणाच्या पाया पडला?

दांबुला येथे झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची श्रीलंकन खेळाडूंशी वादावादी झाली. मात्र सामन्यानंतर त्याने श्रीलंकेचे माजी कर्णधार अनुरा टेनेकुन यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले.

Published On: 

Vaibhav Sooryavanshi Fight - Vaibhav touching feet of Sri Lankan legend Anura Tennekoon after match

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणं आणि तिथे थेट प्रतिस्पर्धी खेळाडूंशी भिडणं… हे ऐकायला थोडं फिल्मी वाटतंय ना? पण सध्या श्रीलंकेत असंच काहीसं घडलंय. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) सध्या त्याच्या खेळापेक्षा एका मोठ्या वादामुळे चर्चेत आला आहे.

दांबुला येथे काल १५ जूनला भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यात तिरंगी मालिकेतील थरारक सामना पार पडला. हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारली.

Vaibhav Sooryavanshi Video

पण सामना गमावल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना वैभव आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाला. दोघांनी एकमेकांना धक्के दिले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.

एका बाजूला हा वादाचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच, दुसरीकडे वैभवचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मैदानावर रागात दिसलेला वैभव नंतर चक्क एका गृहस्थांचे पाय धरून आशीर्वाद घेताना दिसतोय. हे गृहस्थ दुसरे-तिसरे कुणी नसून, श्रीलंकेचे पहिले वनडे कर्णधार अनुरा टेनेकुन आहेत. १९७५ च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी श्रीलंकेचं नेतृत्व केलं होतं.

टेनेकुन यांनी या १५ वर्षीय खेळाडूला एक मोलाचा सल्ला दिला. “लोक काय बोलतील याचा विचार करू नकोस, फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित कर,” असं ते वैभवला म्हणाले.

तत्पूर्वी, मैदानावर नेमकं काय घडलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकन खेळाडूंनी काहीतरी बोलून डिवचल्यानंतर वैभवने रागाच्या भरात एका खेळाडूला धक्का दिला आणि त्यानंतर समोरूनही त्याला धक्का देण्यात आला.

दरम्यान, या सामन्याच्या मुख्य डावात वैभवने आक्रमक खेळ करत अवघ्या १४ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २१ धावा कुटल्या होत्या. दोन्ही संघांनी निर्धारित ५० षटकांत २६५ धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने १६ धावा केल्या. मात्र, १७ धावांचं लक्ष्य गाठताना वैभव आणि सूर्यांश शेडगे यांना केवळ ९ धावाच करता आल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही