मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी केलेल्या अलीकडील विधानांवर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Advt. Gunaratna Sadavarte ) यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केला की, “मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी सातत्याने अवमानकारक भाषा वापरत आहेत. अशा प्रकारची भाषा स्वीकारार्ह आहे का?” असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून केला. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख अपमानास्पद पद्धतीने केला जात असताना त्यावर संबंधित नेते मौन का बाळगतात.” अशी टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
पुढे अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “ठाणे कि रिक्षा हे गाणं ऐकल्यावर शिंदेंना आग लागते मग मनोज जरांगे चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतो, यावर एकनाथ शिंदे काहीच कसे बोलत नाहीत?” असा सवाल त्यांनी केला.
Advt. Gunaratna Sadavarte on Manoj Jarange
पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “भारतीय संविधान लागू झाल्यानंतर सर्व नागरिक समान आहेत आणि कोणालाही इतरांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. कोणत्याही समाजाच्या किंवा नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशा प्रकारच्या वक्तव्यांना विरोध केला जाईल. अशा प्रकारची भाषा वापरल्यास कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल.” असा इशाराही त्यांनी दिला.
“या देशात संविधान अंमलात आल्यापासून कोणीही पाटील किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी शिल्लक उरलेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे इतर समाजाच्या नेत्यांबाबत अपमान करणारी, नीच भाषा वापरतात. तश्याप्रकारे आम्ही भटक्या, विमुक्त, ओबीसी, मागासवर्गीय, भिक्षुकी करणारे ब्राम्हण कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. जरांगेंनी तसं केलं तर कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
यावेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर गंभीर आरोपही केले. जरांगे-पाटील यांचा रेती उपशाच्या व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. तसेच, उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यातील दूरध्वनीवरील संभाषणाचा संदर्भ देत, त्यादरम्यान वापरलेल्या भाषेवर सदावर्ते यांनी आक्षेप घेतला. सार्वजनिक चर्चेत संयम राखणे आणि सभ्य भाषेचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत सदावर्ते यांनी व्यक्त केले. या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘एक तरी बाहेरचा कंत्राटदार दाखवा’; गिरीश महाजनांचं राज ठाकरेंना थेट चॅलेंज
- मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळाले 5,029 कोटी रुपये
- ‘एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा होता’; संजय राऊतांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












