Sanjay Raut : शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या मालकी हक्काबाबतच्या वादावर दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे, हे प्रकरण उद्धव ठाकरे गटाने दाखल केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “जनतेच्या न्यायालयात निकाल आधीच लागला आहे. आम्ही आधी ४० होतो आणि आता आमची संख्या ६० झाली आहे.” याला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांचे उदाहरण दिले आणि त्यांच्या योगदानाची दखल घेतली.
“नारायण राणे यांनी पक्ष सोडला. नारायण राणे मोठे नेते होते. पक्षासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या हे मान्य केले पाहिजे. पक्षवाढीसाठी त्यांनी योगदान दिले होते. हे मान्य केले पाहिजे. मी कधी खोट बोलत नाहीत.” असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Narayan Rane and Shiv Sena
“नारायण राणे यांनी विशिष्ट स्थितीमध्ये पक्ष सोडला. त्यांनी असा दावा केला नाही की, शिवसेना माझी आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. तो पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. पण तो चालला नाही, मग ते भाजपत गेले. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला मनसे स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी असा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता.” असा घणाघात राऊत यांनी केला.
“शिवसेना हा जो पक्ष आहे, त्याचे बाळासाहेब ठाकरे प्रमुख आहेत. आता उद्धव ठाकरे प्रमुख आहेत. मला पक्षाने खासदार केलंय. मी पक्षाच्या आदेशाला बांधिल आहे. मी काही वेगळा निर्णय घेणे म्हणजे पक्षाच्या भूमिकेशी प्रतारणा करण्यासारखे आहे.” असेही राऊत म्हणाले.
शिंदे ४० अंडी घेऊन गेले
“एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जे ४० आमदार आहेत, ते एखाद्या पोल्ट्रीमध्ये कोंबडीने अंडी उबवली, त्यातून हे आमदार बाहेर पडले असे नाही ना. एकनाथ शिंदे ४० अंडी घेऊन गेले, ती त्यांनी उबवायला दिली असे तर नाही ना. ते ४० आमदार, खासदार पक्षाने दिलेले आहेत. पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. निवडणूक आयोगाने दबावाखाली शेण खाल्ले. या देशातील संवैधानिक संस्था दबावाखाली आहेत. विकल्या गेल्या आहेत” असा आरोप देखील राऊतांनी केला.
अजून किती फोडणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याची चर्चा आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावर संजय राऊत म्हणाले की, “तू किती फोडले, मी किती फोडले आणि अजून किती फोडणार या पलीकडे दोघांमध्ये काही आयक्यू आहे असे मला वाटत नाही.”
“महाराष्ट्रात अदानीला कुठल्या प्रॉपट्या अजून द्यायच्या आहेत. उद्योगपतींना अजून काही विकता येईल का? बीईएसटी विकायला काढली आहे. ती अदानीला देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. मेट्रो अंबानीला दिली. विकण्यासाठी अजून काही शिल्लक आहे का? ही दोघांमध्ये चर्चा होईल.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावणं पडणार महागात, राज्यभर धडक कारवाईचे आदेश
- ‘संसदेत येऊन उत्तर द्या’; अमित शहा यांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘लोक भाजपलाच मत देणार असतील तर आता भोगा’; राज ठाकरे यांनी नाशिककरांना सुनावणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











