Share

धनंजय मुंडे यांचा जीममधला घाम आणि ‘ती’ पोस्ट; राजकारणात पुन्हा कमबॅकची जोरदार तयारी?

धनंजय मुंडे यांनी जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडीओ शेअर केला असून, सोबत लिहिलेल्या कवितेतून राजकीय कमबॅकचे संकेत दिले आहेत.

Published On: 

NCP leader Dhananjay Munde working out in gym Instagram video

Dhananjay Munde: गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणातून बाजूला गेलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा एका नव्या रुपात समोर आले आहेत. मुंडेंनी थेट जीममध्ये घाम गाळतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या ओळींनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. “काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे,” अशा सूचक ओळी लिहित त्यांनी आपल्या विरोधकांना आणि स्वकियांनाही एक मोठा राजकीय संदेश दिला आहे.

बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे सध्या स्वतःच्या आरोग्यावर आणि फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्यातील ट्रान्सफॉर्मेशन स्पष्टपणे दिसून येत आहे. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये मुंडे म्हणतात,

“काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे

भेगाळलेले पाय आणि घायाळ मन, अजूनही धैर्य टिकवून आहे…

निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे…

हरवण्याची आता बिशाद कुणाची, स्वतःशी सुद्धा लढतो आहे.”

या शब्दांमधून त्यांनी आपण कोणत्याही संकटासमोर खचलो नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळेच आता त्यांच्या या नव्या लूक आणि पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Dhananjay Munde Gym Video Viral

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ पोस्टचा नेमका राजकीय अर्थ काय?

अलीकडच्या काळात धनंजय मुंडेंवर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठी संकटं आली होती. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात मुंडेंचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं होतं. या घटनेनंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली आणि परिणामी त्यांना मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावं लागल्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर अनेकदा त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या, पण त्या कधीच वास्तवात उतरल्या नाहीत.

दुसरीकडे, नुकतंच पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुंडेंनी त्यांना पत्रकारांशी बोलण्यापासून थांबवलं होतं. मुंडेंनी स्वतःच माध्यमांना सांगितलं की ‘त्या आता बोलणार नाहीत’. या प्रकारामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना जाहीरपणे समज दिली होती. थोडक्यात सांगायचं तर, गेल्या काही महिन्यांतील या सगळ्या वादळानंतर, आता जीममधला हा व्हिडीओ आणि ही कविता शेअर करत धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात शड्डू ठोकण्याचे आणि जोरदार कमबॅक करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही