Share

सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात अचानक वाढ; पाहा तुमच्या शहरातील आजचे नवे दर

केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राईसमध्ये अचानक वाढ केल्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Published On: 

Gold Price Today - Pure gold biscuits and silver bars with market price graphics

🕒 1 min read

जर तुम्ही येत्या काही दिवसांत सोन्या किंवा चांदीचे दागिने (Gold Price Today) खरेदी करण्याचा बेत आखत असाल, तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी ग्राहकांना दिलासा देणाऱ्या केंद्र सरकारने अचानक असा एक निर्णय घेतलाय, ज्यामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

शासनाने सोने आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) थेट वाढ केली आहे. नव्या निर्णयानुसार, सोन्याच्या आयात किमतीत प्रति १० ग्रॅम ५ डॉलर, तर चांदीमध्ये प्रति किलो चक्क ८३ डॉलरची वाढ करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे बाजारात घबराट पसरली आहे.

Gold Price Today

या निर्णयाचा थेट परिणाम आज १६ जून २०२६ रोजी देशातील प्रमुख शहरांमधील दरांवर दिसून आला. मुंबई आणि पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५१,५३० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, २२ कॅरेटसाठी ग्राहकांना १,३८,९०० रुपये मोजावे लागत आहेत. नाशिकमध्ये २४ कॅरेटचा भाव १,५१,५६० रुपये आहे, तर चेन्नईत हाच दर देशात सर्वाधिक म्हणजे १,५३,४९० रुपयांवर नोंदवला गेलाय.

चांदीच्या बाबतीतही आज मोठी दरवाढ पाहायला मिळतेय. मुंबई, पुणे, दिल्ली आणि नाशिकमध्ये आज १ किलो चांदीचा दर तब्बल २,६५,००० रुपयांवर गेला आहे. चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये तर हा भाव प्रति किलो २,८०,००० रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच सरकारने सोन्याच्या आयात किमतीत ८० डॉलर आणि चांदीत २७६ डॉलरची कपात केली होती. मात्र, आता अचानक आयात शुल्क वाढवल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यापार तूट कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.

याशिवाय, ९९.९% शुद्धता असलेली चांदी आता ‘फ्री’ श्रेणीतून काढून ‘प्रतिबंधित’ श्रेणीत टाकण्यात आली आहे. याचा अर्थ आता केवळ अधिकृत बँका किंवा आरबीआयने मान्यता दिलेल्या एजन्सीजमार्फतच तिची आयात करता येईल. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि डॉलरच्या किमतीतील बदलांमुळे आगामी काळात दरांमध्ये अशीच अस्थिरता राहू शकते, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही