Share

‘तो म्हातारा नाही, तर…’; अरबाजपेक्षा २३ वर्षांनी लहान असलेल्या शूराचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

अरबाज खानच्या वाढत्या वयावरून डिवचणाऱ्या ट्रोलर्सना पत्नी शूरा खानने चोख प्रत्युत्तर दिलं असून, तिची ही इन्स्टाग्रामवरील पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published On: 

Arbaaz Khan Sshura Khan - Sshura replying to trolls on Instagram

तुमच्यापेक्षा २३ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत संसार थाटणं सोपं असतं का? बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि त्याची दुसरी पत्नी शूरा खान यांच्या बाबतीत हा प्रश्न कायम विचारला जातो.

मलायका अरोरासोबतच्या घटस्फोटानंतर अरबाजनं वयाने खूपच लहान असलेल्या शूरासोबत नवा संसार थाटला. तेव्हापासूनच या दोघांच्या वयातलं अंतर हा सोशल मीडियावर चर्चेचा आणि बऱ्याचदा ट्रोलिंगचा विषय बनलाय.

Sshura Khan On Arbaaz Khan

अलीकडेच इन्स्टाग्रामवर एका सवाल पूछो सेशनमध्ये शूरा खानला असाच एक बोचरा प्रश्न विचारण्यात आला. एका युजरने थेट विचारलं की एका म्हाताऱ्यासोबत तू खूश आहेस का? यावर संतापण्याऐवजी शूरानं असं काही उत्तर दिलं, ज्याची सध्या बॉलिवूडच्या वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

ट्रोलरला सडेतोड उत्तर देताना शूरा म्हणाली की, “खरंच का? ते म्हातारे नाहीत, ते एक लिमिटेड-एडिशन विंटेज मॉडेल आहेत.” तिचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून, अनेकांनी तिच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलंय.

याच सेशनमध्ये चाहत्यांनी तिला अनेक वैयक्तिक प्रश्नही विचारले. अरबाजसोबतच्या पहिल्या डेटचा किस्सा सांगताना ती म्हणाली की मी अरबाजसोबत एक पैज हरले होते, त्यामुळे शिक्षा म्हणून मला त्याला डिनरला घेऊन जावं लागलं होतं.

या दोघांना नुकतीच एक मुलगी झाली असून तिचं नाव ‘सिपारा’ असं ठेवलंय. विशेष म्हणजे, हे नाव अरबाजचे वडील आणि सुप्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी ठेवलं असल्याची माहिती शूरानं दिली. सध्या आपण पूर्णवेळ आई आणि पत्नी या भूमिकेत खूप खूश असल्याचंही तिनं स्पष्ट केलं.

प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनावरही तिने मनमोकळी प्रतिक्रिया दिली. एका युजरनं वजन वाढल्याची आठवण करून देताच, “थोडंसं नाही, माझं वजन चक्क २० किलोनं वाढलंय,” असा प्रामाणिक खुलासा तिनं हसत हसत केला.

शूरा खान ही मूळची व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. तिने रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांच्यासोबत काम केलं आहे. २०२३ मध्ये तिने अरबाजशी लग्नगाठ बांधली. आता ती आपल्या मातृत्वाचा जादुई प्रवास एन्जॉय करत असल्याचं तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून स्पष्ट होतंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही