अमेरिका-इराण युद्धविरामाची घोषणा; बाजारात सोने-चांदीचे दर अचानक कडाडले!

अमेरिका आणि इराणमधील शांतता कराराच्या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली असून सोने २७०० तर चांदी तब्बल १० हजार रुपयांनी महागली आहे.

Published On: 

Gold Silver Price: Stack of gold coins and silver bars reflecting the current market price surge

आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध थांबण्याची बातमी येते आणि इकडे भारतीय सराफा बाजारात एका रात्रीत मोठे फेरबदल होतात, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? पण सध्या असंच काहीसं घडलं आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे, पण त्याचे थेट आणि मोठे पडसाद आता सोने-चांदीच्या दरांवर (Gold Price Today) उमटू लागले आहेत.

Gold Price Today

येत्या १९ जानेवारीला जिनिव्हामध्ये अमेरिका आणि इराण (US Iran Deal) यांच्यात एका महत्त्वपूर्ण शांतता करारावर स्वाक्षऱ्या होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ही मोठी जागतिक घडामोड समोर येताच आंतरराष्ट्रीय शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सोन्या-चांदीच्या दरांनी एका रात्रीत मोठी उसळी घेतली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, शनिवारपर्यंत १ लाख ४८ हजार ३०० रुपयांवर असलेले १० ग्रॅम सोन्याचे दर सोमवारी बाजार उघडताच थेट १ लाख ५१ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच एका झटक्यात सोन्याच्या दरात २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली.

दुसरीकडे, चांदीने तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झेप घेतली आहे. शनिवारी २ लाख ४४ हजार रुपये प्रतिकिलो असणारी चांदी आता तब्बल १० हजार रुपयांनी वधारून २ लाख ५४ हजार रुपयांवर गेली आहे. हे दोन्ही दर जीएसटी वगळून आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीत ग्राहकांना आणखी पैसे मोजावे लागतील.

हा बहुचर्चित शांतता करार एकूण तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव जसजसा पूर्णपणे निवळेल, तसतसा आगामी काळात सोने आणि चांदीच्या दरात आणखी भडका उडेल, अशी शक्यता बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सध्या ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.

या जागतिक घडामोडींचा परिणाम केवळ सराफा बाजारावरच थांबलेला नाही. अमेरिका आणि इराण कराराच्या वृत्ताने कच्च्या तेलाचे दर तातडीने घसरले आहेत. तर आशियाई शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने तब्बल १३०० अंकांची उसळी घेतली असून निफ्टीनेही २४ हजारांचा टप्पा ओलांडत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही