Share

‘छावा’मधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल

लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेने वयाच्या ३० व्या वर्षी मुंबईत कथितरित्या आत्महत्या केली असून पोलीस तिच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत.

Published On: 

Sanchita Ugale Death: Chhava and Kumkum Bhagya movie actress Sanchita Ugale photo

ग्लॅमर जगताच्या झगमगाटामागे दडलेलं गडद वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे का? अवघ्या ३० व्या वर्षी एका उमद्या आणि गुणी अभिनेत्रीने अचानक जगाचा निरोप घ्यावा, या धक्कादायक बातमीवर सध्या कोणाचाही सहज विश्वास बसत नाहीये.

‘कुमकुम भाग्य’ आणि ‘छावा’ सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिचे निधन झाले आहे. संचिताने मुंबईतील आपल्या राहत्या घरात कथितरित्या आत्महत्या करत आपले जीवन संपवले. तिच्या या आकस्मिक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे.

Sanchita Ugale Death

संचिताच्या या टोकाच्या पावलामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या घटनेची नोंद करून चौकशी सुरू केली आहे. संचिताने इतका मोठा निर्णय का घेतला, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

संचिताने मनोरंजन विश्वात स्वतःच्या मेहनतीवर आपले स्थान निर्माण केले होते. झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ या कमालीच्या लोकप्रिय मालिकेत तिने साकारलेली दीया टंडनची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर तिच्याकडे अनेक नव्या ऑफर्स येऊ लागल्या. तिने ‘दिलवाली दुल्हा ले जाएंगे’ या मालिकेतही छान काम केले होते.

छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर संचिताने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले. अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात ती महाराणी ताराराणी यांच्या तरुणपणीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या सशक्त अभिनयाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही मोठे कौतुक केले होते.

चित्रपटांसोबतच संचिताने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आपले नशीब आजमावले होते. अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सायलेन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट’ या गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाचाही ती एक भाग होती. हळहळू यशाची पायरी चढत असतानाच तिने अचानक हे जग सोडल्याने तिचे चाहते कमालीचे भावूक झाले आहेत.

दुसरीकडे, संचिताच्या जाण्यानंतर तिने वर्षभरापूर्वी केलेले एक भाष्य आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मे २०२५ मध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूनंतर संचिताने ऑनलाईन विश्वातील मानसिक दबावाबद्दल मोठी चिंता व्यक्त केली होती. तरुण मुले आपल्या आयुष्याबद्दल किती सहजपणे विचार करतात, हे पाहून आपल्याला खूप दुःख होते, असे ती म्हणाली होती.

ऑनलाईन व्हॅलिडेशन आणि सोशल मीडियाचे व्यसन यावर अत्यंत प्रगल्भ मत मांडणाऱ्या संचिताने स्वतःच असे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येऊ शकेल. सध्या सोशल मीडियावर तिचे चाहते तिला श्रद्धांजली वाहात आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही