Share

शहराचे नाव बदलले, मग बँकेचे नाव का नाही? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांचे थेट एमडींना पत्र

शहराचे नाव बदलूनही बँक जुन्या नावानेच का? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांनी थेट एमडींना दिले पत्र.

Published On: 

Legal letter for ADCC bank name change to Chhatrapati Sambhajinagar submitted to MD

छत्रपती संभाजीनगर- शहराचे आणि जिल्ह्याचे नाव अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ होऊन आता बराच काळ लोटला आहे. महसूल आणि न्यायालयाच्या दप्तरात हा बदल लागू झाला, मग जिल्ह्याची सर्वात मोठी आर्थिक वाहिनी असलेली बँक अजूनही जुन्याच नावाने का चालवली जात आहे? हा प्रश्न आता थेट बँकेच्या दारात पोहोचला आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (ADCC) नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ करावे, या मागणीने आता कायदेशीर स्वरूप घेतले आहे. उच्च न्यायालयाचे वकील ॲड. ईश्वर नरोडे पाटील आणि ॲड. अमरजीत तायडे यांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) मोटे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तिथे त्यांनी नाव बदलण्यासाठीचे मागणीचे पत्र त्यांनी दिले आहे.

Legal letter for ADCC bank name

राज्य सरकार आणि केंद्राने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्याच्या नवीन नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयानेही त्याला कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याची मुख्य वित्तीय संस्था जुन्याच नावाने चालवणे ही एक मोठी प्रशासकीय विसंगती असल्याचे पत्रात नमूद केले आहे. बँकेने जिल्ह्याच्या नवीन ओळखीचा आदर राखत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी वकिलांनी केली आहे.

ही प्रक्रिया एका रात्रीत होत नाही, त्यासाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १३ आणि १४ नुसार यासाठी पावले उचलावी लागतील. सर्वात आधी संचालक मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन ठराव संमत करावा लागेल. त्यानंतर विशेष आमसभा (EGM) बोलावून सभासदांच्या बहुमताने तो मंजूर करून घ्यावा लागेल.

सामान्य ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की नाव बदलले तर आपल्या ठेवींचे काय होईल? पण कायद्यातील कलम १४ नुसार नाव बदलल्यामुळे बँकेचे करार, ठेवीदार आणि ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही कायदेशीर परिणाम होत नाही. सर्व व्यवहार पूर्णपणे सुरक्षित राहतात. आता या कायदेशीर निवेदनानंतर बँक प्रशासन किती वेगाने पावले उचलते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही