Share

संचिता उगलेच्या मृत्यूवर रवी किशन यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले ‘असं केल्याने आत्म्याला…’

‘कुमकुम भाग्य’ फेम संचिता उगलेच्या आत्महत्येवर अभिनेते रवी किशन यांनी दुःख व्यक्त करत तरुणाईला मानसिक आरोग्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Published On: 

Ravi Kishan Sanchita Ugale - Actor Ravi Kishan reacts to TV actress Sanchita Ugale suicide case.

🕒 1 min read

‘कुमकुम भाग्य’ आणि ‘साजन घर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी स्वतःचं जीवन का संपवलं? हाच प्रश्न सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वाला सतावत आहे. १४ जूनला नालासोपारा येथील तिच्या फ्लॅटमध्ये घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का दिलाय.

पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. मात्र, अद्याप तिच्या या टोकाच्या निर्णयामागचं ठोस कारण अधिकृत सूत्रांकडून समोर आलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड तणावात असल्याच्या आणि त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Ravi Kishan on Sanchita Ugale Suicide

अशातच आता भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांनी संचिताच्या निधनावर अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआयला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत रवी किशन यांनी आजकालच्या तरुणाईच्या मानसिक स्थितीबद्दल मोठी चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले, “आपण नुकतंच एका तरुण कलाकाराला गमावलं आहे. ही घटना मनाला खूप चटका लावून जाणारी आणि दुःखद आहे.” सततच्या नैराश्यावर मात करण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला. “आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येतातच. जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या वाट्याला दुःख आलं नाहीये. पण आपल्याला जगायचं असतं. त्यासाठी ध्यानधारणा आणि पूजापाठ खूप गरजेचा आहे, यातूनच आपल्याला खंबीर राहण्याची मानसिक ताकद मिळते.”

संचिताने उचललेल्या टोकाच्या पावलाबद्दल बोलताना ते थोडे कठोरही झाले. “आत्महत्या हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे. असं केल्याने आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही,” अशी रोखठोक आणि थेट प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.

दुसरीकडे, रवी किशन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, राजकारणासोबतच ते अभिनयातही प्रचंड सक्रिय आहेत. अलीकडेच नेटफ्लिक्सवरील ‘माई-बहीण’ या डार्क कॉमेडी सीरिजमध्ये ते माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत दमदार भूमिकेत झळकले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही