Share

समंथाने घेतली मुख्यमंत्री विजय यांची भेट, अभिनेत्याचं यश पाहून म्हणाली ‘त्यासाठी मोठी हिंमत लागते…..’

अभिनेत्री समंथाने तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची नुकतीच भेट घेतली. यशस्वी करिअर सोडून राजकारणात येण्यासाठी मोठी हिंमत लागते, असं म्हणत तिने त्यांचं जाहीर कौतुक केलं आहे.

Published On: 

Samantha meets CM Vijay - Actress Samantha congratulates Tamil Nadu CM Thalapathy Vijay.

तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एका नव्या पर्वाची सुरुवात झालीये, हे तर सगळ्यांनाच माहितीये. पण सुपरस्टार विजय यांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयानंतर आता एक मोठी अभिनेत्री त्यांना थेट भेटायला पोहोचली, हे तुम्हाला माहितीये का?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) हिने नुकतीच तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय (Thalapathy Vijay) यांची सदिच्छा भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिने त्यांचं अभिनंदन तर केलंच, शिवाय सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक अतिशय रोखठोक आणि भावूक प्रतिक्रियाही दिली आहे.

Samantha Ruth Prabhu meet CM Vijay 

समंथाने आपल्या पोस्टमध्ये विजय यांच्या राजकीय वाटचालीचं भरभरून कौतुक केलंय. “मला कायम असं वाटायचं की, विजय सर फक्त पडद्यावरचा हिरो बनण्यासाठी आलेले नाहीत. त्यांची ऊर्जा आणि लोक त्यांना ज्या पद्धतीने दाद देतात, ते पाहता ते नक्कीच एका मोठ्या उद्दिष्टासाठी बनले आहेत,” असं स्पष्ट मत तिने मांडलं.

सिनेमातलं एवढं मोठं आणि यशस्वी करिअर पणाला लावणं सोपी गोष्ट नसते. याबद्दल बोलताना समंथा म्हणाली, “ज्या क्षेत्रात तुम्ही मास्टर आहात, ते मागे सोडून संपूर्णपणे एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी मोठी हिंमत लागते. हे सगळं सोपं नाहीये, पण स्वतःवर असलेल्या विश्वासातून बदल घडवण्याची त्यांची ताकद मला खूप प्रेरणा देते.”

जनसेवेच्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना समंथाने एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. आयुष्यात असा एक टप्पा येतो जिथे माणसाने स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा विचार केला पाहिजे, असं ती म्हणाली. सध्या या दोन मोठ्या स्टार्सच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये याची जोरदार चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही