🕒 1 min read
राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणि अंधभक्तीपोटी एखाद्याच्या खाजगी आयुष्याला किती मोठा फटका बसू शकतो? दाक्षिणात्य सुपरस्टार आणि ‘टीव्हीके’ पक्षाचे प्रमुख थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्यावर सध्या असाच एक अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारा आरोप झाला आहे.
बिग बॉस तमिळ (Bigg Boss Tamil) फेम आणि २०१७ च्या जलीकट्टू आंदोलनातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री ज्युली (Julie) हिने थेट थलपती विजय आणि त्यांच्या समर्थकांवर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Thalapathy Vijay TVK
विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) पक्षाच्या समर्थकांकडून झालेल्या सततच्या ऑनलाईन ट्रोलिंग आणि मानसिक छळामुळेच आपला गर्भपात झाल्याचा धक्कादायक दावा ज्युलीने केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युलीने याप्रकरणी चेन्नई पोलिसांत धाव घेत आठ जणांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तिचे नुकतेच लग्न झाले होते, मात्र सोशल मीडियावरील या बदनामीच्या आणि छळवणुकीच्या सत्रामुळे तिला तिच्या पहिल्या बाळाला मुकावे लागले आहे.
पत्रकार परिषदेत भावूक होत ज्युली म्हणाली, “माझ्या पतीबद्दल आणि माझ्या चारित्र्याबाबत अत्यंत घाणेरड्या कमेंट्स केल्या गेल्या. माझ्या बाळाच्या मृत्यूला थेट विजय अण्णा जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक शब्द जरी सुनावला असता आणि त्यांना रोखले असते, तर आज मला माझं सर्वस्व गमवावं लागलं नसतं.”
मार्च महिन्यातच तिने या ऑनलाईन छळाविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, जाणीवपूर्वक या प्रकरणाची तीव्रता कमी करून त्याला दिवाणी स्वरूप (Civil Defamation) देण्यात आल्याचा तिचा आरोप आहे. केवळ आपण ‘टीव्हीके’ पक्षाच्या विरोधात आवाज उठवला, म्हणूनच आपल्यावर १५ लाखांच्या किडनी घोटाळ्याचे खोटे आरोप रचण्यात आल्याचेही तिने म्हटले आहे.
राजकीय कुरघोडीच्या या खेळात आपल्यासारख्या सामान्य महिलेचा बळी जात असल्याचा उद्वेग ज्युलीने व्यक्त केला आहे. सध्या चेन्नई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे, या गंभीर आरोपांवर थलपती विजय किंवा त्यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘भगवान भरोसे काम चालवू नका’, देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार; वॉर रूमच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला थेट अल्टिमेटम
- अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात मोठे भगदाड, १५ बड्या नेत्यांनी एकाच वेळी सोडला पक्ष
- मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












