Share

अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात मोठे भगदाड, १५ बड्या नेत्यांनी एकाच वेळी सोडला पक्ष

माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडू भाजपमधील १५ हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सामूहिक रामराम ठोकल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

K Annamalai resigns K Annamalai addressing public after quitting BJP in Tamil Nadu

🕒 1 min read

दिल्ली – माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता राज्यातील भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी आपल्या पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, केवळ हे दोनच मोठे चेहरे नव्हे तर त्यांच्यासोबत पक्षाच्या किमान १४ इतर प्रमुख अधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत. एकाच वेळी झालेल्या या मोठ्या बंडखोरीमुळे राज्यातील भाजपची संपूर्ण संघटनात्मक फळीच कोलमडून पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजीनामा दिल्यानंतर माजी उपाध्यक्ष करू नागराजन यांनी थेट अण्णामलाई यांनी सुरू केलेल्या नव्या राजकीय चळवळीत सामील होण्याची इच्छा जाहीर केली आहे. अण्णामलाई यांच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक करताना ते म्हणाले की, अण्णामलाई हे खूप धाडसी आहेत आणि त्यांना अनेक क्षेत्रांची कमालीची सखोल जाण आहे. ते एक खंबीर आणि सक्षम नेते आहेत.

त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय असो वा इतर कोणीही, त्यांच्या चुका उघड करताना अण्णामलाई यांनी कधीच संकोच केला नाही, असे नागराजन यांनी स्पष्ट केले. अण्णामलाई यांच्या याच खंबीर आणि पारदर्शक स्वभावावर विश्वास ठेवूनच आता भाजपमधील जुने जाणते कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले आहेत.

दुसरीकडे, भाजपच्या राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली. अत्यंत जड अंतःकरणाने मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असून भारतीय जनता पक्षाशी असलेला माझा प्रदीर्घ संबंध संपवत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि भाजपच्या राष्ट्रसेवा, देशभक्तीच्या विचारांनी प्रेरित होऊन मी आजवर काम केले, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. हेच मूल्य भविष्यातही मला मार्ग दाखवतील असे त्या म्हणाल्या. अण्णामलाई यांच्या पाठोपाठ झालेल्या या सामूहिक राजीनाम्यांमुळे तामिळनाडूतील भाजपचे (Tamil Nadu BJP) राजकारण आता पूर्णपणे तापले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही