Share

‘तुझं आजारपण प्रसिद्धीसाठी वापर, माझ्यावर भुंकू नकोस’; शिल्पा शिंदेचा हिना खानवर संताप

खोट्या आरोपांच्या कबुलीनंतर हिना खानने केलेल्या टीकेवर शिल्पा शिंदेने संताप व्यक्त करत हिनाच्या आजारपणाचा उल्लेख करून सडेतोड उत्तर दिले आहे.

Published On: 

Shilpa Shinde Hina Khan controversy - Shilpa reacts to Hina over false allegation confession

🕒 1 min read

एखाद्या सहकलाकाराच्या आजारपणावर आणि घरातील व्यक्तीच्या निधनावर कोणी इतक्या खालच्या थराला जाऊन टीका करू शकतं? टीव्ही जगतातील दोन ‘बिग बॉस’ विजेत्या अभिनेत्रींमधला वाद आता अत्यंत उग्र वळणावर पोहोचला आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) चक्क हिना खानवर अत्यंत जळजळीत शब्दांत भडास काढली आहे. या संपूर्ण वादाची ठिणगी कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये पडली. तब्बल दहा वर्षांनंतर शिल्पाने एक धक्कादायक कबुली देत सर्वांनाच हादरवून सोडलं.

Shilpa Shinde vs Hina Khan

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेच्या निर्मात्यांवर आपण लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले होते, असं तिने हसत हसत मान्य केलं. तिच्या या वक्तव्यानंतर हिना खानने (Hina Khan) तिच्यावर कडाडून टीका केली होती.

हिनाच्या या टीकेला उत्तर देताना शिल्पाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. तिने थेट नाव घेतलं नसलं तरी तिचा रोख हिनाकडेच असल्याचं स्पष्ट आहे. “लोक माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवणं कधी बंद करणार? धावत्या ट्रेनमध्ये चढू नका, मार बसेल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचं आजारपण आहे, घरातल्या व्यक्तीच्या निधनाचा मुद्दा आहे, मग माझ्याच नावाची का गरज पडते?” असा उपरोधिक आणि संतापजनक सवाल शिल्पाने विचारला आहे.

एवढ्यावरच न थांबता शिल्पाने थेट इशारा दिलाय की जुन्या कबरी उकरून काढू नका. “ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, त्यावर उगाच भुंकणं थांबवा. गरज पडल्यास मी असे पुरावे देईन की लोक त्या व्यक्तीचा तिरस्कार करतील,” असा थेट इशाराच तिने दिला आहे. जर तेव्हा साथ दिली असती, तर आज ही वेळ आली नसती, असंही ती म्हणाली.

२०१६ मध्ये शिल्पाने निर्माते संजय कोहली यांच्यावर खोटे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तिच्या या लज्जास्पद कबुलीनंतर आता एका स्वयंसेवी संस्थेने तिच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

तर अभिनेत्री पूजा बेदी आणि हिना खानने या कृत्याला अत्यंत संतापजनक ठरवत कडक शिक्षेची मागणी केली होती. या नव्या व्हिडीओमुळे टीव्ही इंडस्ट्रीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही