Share

कंगनाची ‘ती’ पोस्ट शेअर केली अन् गिरीजा ओकचे हजारो फॉलोअर्स घटले; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

गिरीजा ओकने इन्स्टाग्रामवर कंगना रनौतची पोस्ट शेअर केल्याने तिचे हजारो फॉलोअर्स अचानक कमी झाले. एका मुलाखतीत तिने या घटनेवर अत्यंत स्पष्ट मत मांडलं आहे.

Published On: 

Girija Oak and Kangana Ranaut - Girija Oak reveals she lost followers after sharing Kangana Ranaut's post

🕒 1 min read

सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकल्याने एका रात्रीत हजारो फॉलोअर्स अचानक सोडून जाऊ शकतात, याची तुम्ही कधी कल्पना केलीय का? ‘नॅशनल क्रश’ म्हणून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) हिच्यासोबत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. निमित्त होतं, बॉलिवूडची ‘क्वीन’ आणि खासदार कंगना रनौत हिच्या एका पोस्टचं!

गिरीजा लवकरच कंगना रनौतसोबत (Kangana Ranaut) ‘भारत भाग्य विधाता’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. याच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत गिरीजाने हा अजब किस्सा शेअर केला.

Girija Oak on Kangana Ranaut

चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या आणि मुख्य भूमिकेत असलेल्या कंगनाची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करताच आपले फॉलोअर्स हजारोने कमी झाल्याचा खुलासा तिने केला आहे. या घटनेबद्दल बोलताना गिरीजाने अत्यंत स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं.

ती म्हणाली, “काही वेळानंतर जेव्हा मी दुसरी पोस्ट टाकली, तेव्हा पुन्हा माझे फॉलोअर्स वाढले. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की, आपण सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही.” किती लोकांनी पोस्ट पाहिली किंवा फॉलोअर्स वाढले-घटले यापेक्षा आपल्याला जो निर्णय योग्य वाटतो, तो घेऊन काम करत राहणं महत्त्वाचं असल्याचं तिने आवर्जून सांगितलं.

‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित होत आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कामा रुग्णालयातील नर्सेसने दाखवलेल्या धैर्यावर हा चित्रपट आधारित आहे. सफाई कर्मचारी, पोलीस आणि सर्वसामान्य लोकांच्या धाडसाला यात सलाम करण्यात आला आहे.

दरम्यान, याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगना आणि गिरीजा यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळतेय. एका मुलाखतीत स्वतः कंगनाने गिरीजाला मिळालेल्या ‘नॅशनल क्रश’ या टॅगची दखल घेतली होती. ‘कृपया तुझ्या सौंदर्याचा वापर करून आपल्या चित्रपटाचं प्रमोशन कर,’ असं कंगनाने तिला गमतीत म्हटलं होतं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही