स्वयंपाकघरात शेजाऱ्याचा मृतदेह अन्..; ओटीटीवर माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ नव्या सिनेमाने उडवली खळबळ!

स्वयंपाकघरात सापडलेला शेजाऱ्याचा मृतदेह लपवण्याची कथा सांगणारा माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरीचा ‘मां बहन’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Published On: 

Maa Bahen Netflix movie - Madhuri Dixit and Tripti Dimri in a dark comedy thriller scene

तुमच्या घरात अचानक शेजाऱ्याचा मृतदेह आढळला तर तुम्ही काय कराल? नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो ना? पण याच भयंकर परिस्थितीवर आधारित एक नवा सिनेमा सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

नेटफ्लिक्सवर ४ जून २०२६ रोजी ‘मां बहन’ (Maa Bahen Netflix movie) हा डार्क कॉमेडी थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. २ तास ७ मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर येताच प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून, सध्या याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

Madhuri Dixit Netflix Movie

सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा अक्षरशः डोक्याचा भुगा करणारी आहे. एका विधवा आई आणि तिच्या दोन मुलींच्या आयुष्यात अचानक एक वादळ येतं. त्यांच्याच किचनमध्ये शेजाऱ्याचा मृतदेह सापडतो आणि इथूनच खऱ्या थराराला सुरुवात होते.

हा मृतदेह लपवण्यासाठी या तिघी मायलेकी मिळून काय काय जुगाड करतात आणि त्यांच्या वाट्याला कोणते अडथळे येतात, याचा रंजक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हसवता हसवता समाजातील एका संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यावरही हा सिनेमा अत्यंत मार्मिक भाष्य करतो.

माधुरी दीक्षित आणि सध्याची लोकप्रिय अभिनेत्री तृप्ती डिमरी यांची यातील मुख्य भूमिका लक्षवेधी ठरतेय. त्यांच्यासोबतच रवी किशन, गीतांजली कुलकर्णी, अरुणोदय सिंह आणि शार्दुल भारद्वाज यांच्याही यात दमदार भूमिका आहेत. त्यामुळे या वीकेंडसाठी हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही