🕒 1 min read
मुंबई – एखादी तरुण अभिनेत्री अचानक जगाचा निरोप घेते तेव्हा मागे अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडून जाते. टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्येने सध्या संपूर्ण सिनेसृष्टी हादरली असून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
संचिताने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य का संपवलं, याचं गूढ अजून उकललेलं नाही. अशातच आता या प्रकरणाला एक मोठं वळण मिळालं असून तपासाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संचिता उगले मृत्यू प्रकरणात SIT चौकशीची मागणी
अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेने (AICWA) आता या प्रकरणात थेट उडी घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या प्रकरणात विशेष हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता उगलेच्या (Sanchita Ugale) मृत्यू प्रकरणाचा तपास अधिक वेगाने व्हावा यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात यावी, अशी मागणी गुप्ता यांनी पत्रात केली आहे. ही चौकशी पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी सिनेसृष्टीची इच्छा आहे.
दुसरीकडे, संचिताने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास लावून आपले आयुष्य संपवले होते. तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आणि कलाकार मित्रांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
संचिता गेल्या ६ महिन्यांपासून गंभीर डिप्रेशनशी लढत होती. मात्र, तिच्या या मानसिक त्रासामागे नक्की काय कारण होतं आणि तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्रामुळे आता प्रशासकीय पातळीवर हालचाली वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता एसआयटीची स्थापना होणार का आणि संचिताच्या मृत्यूमागचं खरं सत्य बाहेर येणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे ‘ते’ ६ बंडखोर खासदार दिल्लीतून अचानक गायब; एकनाथ शिंदेंची रणनीती बदलली?
- पावसाची पुन्हा दगाबाजी! मान्सून थेट जुलैत धडकणार, विदर्भात उष्णतेचा अलर्ट
- घसा बसला, तरीही मंचावर; सोनू निगमला नेमका कोणता गंभीर आजार झालाय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












