“काँग्रेसने त्यांची जात दाखवून दिली”; संजय काकडेंची आक्रमक प्रतिक्रिया

‘गुंगी गुडिया’ वादावर संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Published On: 

Sanjay Kakade demands Sapkal’s resignation

मुंबई : काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा केला आहे. या विधानामुळे राज्यातील राजकारण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी यावर तीव्र टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या या विधानाचे समर्थन केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय काकडे (Sanjay Kakade) नेमके काय म्हणाले, ते पाहूया.

राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे म्हणाले, “इतक्या घाण वृत्तीची काँग्रेस आहे, त्यांनी त्यांची जात दाखवून दिली. महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवेल. आम्ही त्यांच्याबद्दल असेच काही बोललो असतो तर ते चालले असते का? जर त्यांनी माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्हाला माता-भगिनी नाहीत का? मी राहुल गांधींना विनंती करतो की त्यांनी या प्रदेशाध्यक्षाला त्वरित पदावरून दूर करावे. काँग्रेसच्या सदस्यांमधील सभ्यतेची सर्व जाणीव नष्ट झाली आहे.”

Sanjay Kakade demands Sapkal’s resignation

काकडे पुढे म्हणाले, “इतक्या घाण आणि नालायक माणसाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केले आहे. राहुल गांधींनी त्यांना या पदावरून हटवलेच पाहिजे. राजीव गांधींच्या निधनानंतर त्यांची ‘गुडिया’ कुठे गेली होती? त्या कुठे गायब झाल्या होत्या? जर त्यांनी हे विधान मागे घेतले नाही, तर आम्ही काँग्रेसच्या सदस्यांना राज्यात फिरू देणार नाही. आम्ही त्यांच्या नेत्यांच्या तोंडाला काळे फासू. असे घाणेरडे विधान करताना त्यांना जराही लाज वाटत नाही का? कदाचित प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहण्यासाठी त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून ही विधाने केली असावीत. हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आता या पदावर राहण्यास पात्र नाही.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही