Share

पावसाची पुन्हा दगाबाजी! मान्सून थेट जुलैत धडकणार, विदर्भात उष्णतेचा अलर्ट

राज्यात पावसाची प्रतीक्षा लांबली असून मान्सून आता थेट जुलैच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published On: 

Maharashtra Monsoon Update parched land under hot bright sun

तुम्हीही रोज आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहताय? पण, वरुणराजाने यंदा राज्याला असा काही चकवा दिलाय की ऐकून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

मृग नक्षत्र कोरडं गेलं असून, आता मान्सून चक्क जुलै महिना उजाडल्याशिवाय समाधानकारक बरसणार नसल्याचे धक्कादायक संकेत मिळत आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी (Maharashtra Monsoon Update) सध्या पोषक वातावरण नाही. त्यामुळे त्याची प्रगती पूर्णपणे मंदावली आहे.

Maharashtra Monsoon Update

परिणामी, विदर्भासह (Vidarbha Heatwave Alert) राज्याच्या अनेक भागांत मान्सून थेट २५ जून ते १ जुलै दरम्यानच दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऊस लांबल्याने बळीराजाच्या पेरण्यांचे संपूर्ण गणित कोलमडणार असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर स्पष्ट दिसत आहे.

दुसरीकडे, पावसाने ओढ दिल्यामुळे विदर्भातील जनतेला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अधिकृत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात सर्वच जिल्ह्यांतील पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार राहण्याची शक्यता असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ होणार आहे.

पावसाच्या या दगाफटक्यामुळे पाणीटंचाईचे संकटही आता गडद होऊ लागले आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा भविष्यात पावसाचे प्रमाण घटू शकते.

सध्या धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ५ ते ६ टक्के कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष भरारी पथके नेमली आहेत. नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही परिस्थितीचे गांभीर्य मांडले आहे. “जर पाऊस पडला नाही, तर पुढे भयावह परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे धरणांवर जिथे सिंचनाची गरज नाही, तिथल्या मोटारी तातडीने काढल्या पाहिजेत.

तसेच, रोज पाणीपुरवठा करण्याऐवजी आता नागरिकांना एक दिवसाआड पाणी द्या,” असे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळेच आता पाण्याचा थेंब न् थेंब जपणे ही सर्वांचीच जबाबदारी बनली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही