कडक उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या महाराष्ट्राला वरुणराजा कधी सुखद धक्का देणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना हवामान खात्याने अत्यंत दिलासादायक बातमी दिली असून मान्सूनच्या प्रवासाने चांगलाच वेग घेतला आहे.
केरळमध्ये ५ जून रोजी वेळेवर दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्य व्यापले असून तो कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजनुसार (IMD Monsoon Update), यंदा सुरुवातीच्या टप्प्यातच मान्सून कमालीचा सक्रिय दिसतोय.
IMD Monsoon Update
राज्यातील शेतकरी आणि नागरिक पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ६ जून रोजी कोकण ते विदर्भातील तब्बल २५ जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंतच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर कधीही मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यामुळेच मुंबईकरांनाही आता वाढत्या उन्हाच्या काहिलीपासून आणि उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.
दुसरीकडे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्येकडील आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या सात राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस दणादण पाऊस सुरू राहील, असे संकेत मिळाले आहेत.
उत्तर भारतात ६ जून रोजी दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, ज्यामुळे उष्णतेची लाट कमी होईल. मात्र, ७ जूननंतर या भागातील पावसाचा जोर कमी होईल, तर मध्य प्रदेशात मात्र भोपाळ, इंदूरसह अनेक भागात तापमान कमालीचे घसरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएल गाजवणारा वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत दाखल; टीम इंडिया A ची कमान कुणाकडे, पहिला सामना कधी?
- मान्सून गोव्यात धडकला, आता महाराष्ट्राची वेळ; पावसाच्या एन्ट्रीची नेमकी तारीख काय?
- ‘तुझं आजारपण प्रसिद्धीसाठी वापर, माझ्यावर भुंकू नकोस’; शिल्पा शिंदेचा हिना खानवर संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












