Share

आयपीएल गाजवणारा वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत दाखल; टीम इंडिया A ची कमान कुणाकडे, पहिला सामना कधी?

इंडिया A संघ तिरंगी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला असून वैभव सूर्यवंशीकडे सर्वांच्या नजरा आहेत. भारताचा पहिला सामना ९ जून रोजी खेळवला जाईल.

Published On: 

Vaibhav Suryavanshi reaches Sri Lanka with India A squad for Tri Series

मुंबई – आयपीएलच्या मैदानात आपल्या बॅटची जादू दाखवणारा युवा स्टार वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेत आपली धडाकेबाज खेळी दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

आगामी तिरंगी मालिकेसाठी इंडिया A चा संघ शुक्रवारी श्रीलंकेत दाखल झाला. विमानतळावर पाय ठेवताच वैभवला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची मोठी झुंबड उडाली होती. आयपीएलमधील तडाखेबाज कामगिरीमुळे त्याची लोकप्रियता आता देशाबाहेरही पोहचली आहे.

इंडिया A चे नेतृत्व तिलक वर्माकडे; ऋतुराज गायकवाडची एन्ट्री

या महत्त्वाच्या तिरंगी मालिकेत इंडिया A ची धुरा तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे. मात्र स्पर्धेपूर्वीच संघाला एक मोठा धक्का बसला. उपकर्णधार रियान पराग दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी अनुभवी ऋतुराज गायकवाडला संघात बोलावण्यात आले आहे.

भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील A संघांमध्ये ही वनडे मालिका रंगणार आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार प्रत्येक संघ एकमेकांसोबत दोन सामने खेळेल. भारताचा पहिलाच सामना यजमान श्रीलंका A संघाविरुद्ध ९ जून रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर ११ आणि १७ जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, तर १५ जूनला पुन्हा श्रीलंकेशी भिडत होईल.

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे या सर्व सामन्यांचा थरार लाईव्ह पाहता येणार आहे. ९ जूनचा सामना सकाळी ११ वाजता सुरू होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर आणि ‘सोनी लिव्ह’ ॲपवर या मालिकेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) इथेही आपला फॉर्म कायम ठेवला, तर सीनियर टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी लवकरच उघडू शकतात, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.

भारत A संघ – तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड, आयुष बडोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान.

Live Streaming Details – सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर (सोनी स्पोर्ट्स 1, सोनी स्पोर्ट्स 3, सोनी स्पोर्ट्स 4) केले जाईल. सोनी लिव्ह ॲपवर थेट प्रक्षेपण (Live Streaming) उपलब्ध असेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही