Raj Thackeray : येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक अतिशय गंभीर दावा केला आहे. ठाण्यात झालेल्या मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना त्यांनी थेट दंगलींची भीती व्यक्त केली आहे. सत्तेतील लोकांकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाऊ शकतात, असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी देशातील सद्यस्थितीवर सडकून टीका केली. सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण भयंकर वाढले असून परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पण या खऱ्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारला तुम्हाला जाती-धर्माच्या वादात अडकवून ठेवायचं आहे, असा आरोप त्यांनी केला.
गणेशोत्सवात दंगलींची भीती
राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्क राहण्याचा इशारा
आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी १४ तारखेला सुरू होणाऱ्या गणपती उत्सवाचा विशेष संदर्भ दिला. ते म्हणाले, “मला सर्वाधिक भीती याच गोष्टीची वाटतेय की, आता गणेशोत्सवादरम्यान दंगली घडवल्या जातील. हे फक्त महाराष्ट्रात नाही, तर देशभरात होऊ शकतं. तुम्ही फक्त त्याच गोष्टीत अडकून राहावे आणि मूळ प्रश्नांकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं, हाच यामागचा एकमेव उद्देश आहे.” मुंबईत नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा संदर्भ देत ही तर फक्त सुरुवात असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.
“जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुसलमान आहे, मला त्या दोघांनाही सांगायचे आहे— सतर्क राहा, हकनाक आपली मुले यात जातील आणि आपले सगळे लक्ष तिकडेच जाईल. एकमेकांमध्ये भांडणे लावणे आणि त्यात तुम्हाला गुंतवून ठेवणे, एवढाच कार्यक्रम सध्या सुरू आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- अमित ठाकरेंनी पुण्यात हटवला मोदींचा फोटो, आता राज ठाकरेंचा थेट इशारा; म्हणाले, ‘आत्ताच…’
- लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीच्या मित्राला बेड्या, तपासात धक्कादायक खुलासे
- iPhone 17 Discount: फ्लिपकार्टवर बंपर ऑफर, ८२ हजारांचा आयफोन ५४ हजारांच्या खाली!












