Share

मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट

मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून येत्या ४८ ते ७२ तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Published On: 

Monsoon in Maharashtra - मान्सून अपडेट

🕒 1 min read

पुणे– बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेत, पण यंदाचा पाऊस खरंच वेळेवर येणार का? हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे.

आता यावर एक दिलासादायक बातमी समोर आलीय. भारतीय हवामान विभागाने अखेर केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. काही दिवसांच्या विलंबानंतर मान्सूनने आपला मोर्चा आता महाराष्ट्राच्या दिशेने वळवला असून, राज्यात लवकरच पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार?

आधीच्या अंदाजानुसार मान्सून वेळेपूर्वीच येणार होता. मात्र, हवामानातील बदल आणि समुद्रातील काही घडामोडींमुळे त्याला थोडा ब्रेक लागला. हवामान विभागाचे अधिकारी डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळात पाऊस चांगलाच सक्रिय झालाय. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसांत मान्सूनला महाराष्ट्रात एन्ट्री करण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होत आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ४८ ते ७२ तासांत तळकोकण आणि गोवा पट्ट्यात मान्सून धडकू शकतो. त्यानंतर तो हळूहळू उर्वरित महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळेच, खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच बियाणे आणि खतांची जुळवाजुळव सुरू ठेवावी, असं आवाहन प्रशासनाने केलंय. याबाबत पावसाची पुढील वाटचाल स्पष्ट झाल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही