भिवंडी: भिवंडी (Bhiwandi) शहरातील बालाजी नगर, गंगारामवाडी परिसरातील ‘कोहिनूर अपार्टमेंट’ (Kohinoor Apartment) ही चार मजली इमारत कोसळून दुर्दैवी घटना घडली. या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, जबाबदार व्यक्तींवर त्वरित गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली. गंगारामवाडी येथील १२ ते १४ वर्षे जुनी ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही इमारत अचानक कोसळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आणखी दोन ते तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
CM orders FIR and strict action after Bhiwandi building collapse
‘X’ वरील आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे की, “भिवंडीत एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल (FIR) करून दोषींवर कठोर (Strict Action) कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. जखमींवर उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”
नेमकं काय घडलं ?
काल (३० जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास ही इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.मात्र, अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यास सुरुवात करण्यात अडथळे आले. त्यानंतर, पहाटे एकच्या सुमारास एनडीआरएफ (NDRF) आणि टीडीआरएफ (TDRF) ची पथके घटनास्थळी पोहोचली. इमारतीच्या समोर असलेल्या एका जुन्या चाळीचा भाग जेसीबीच्या साहाय्याने पाडल्यानंतरच बचाव पथकांना कोसळलेल्या इमारतीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आणि बचावकार्याला सुरुवात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या खांबांची दुरुस्ती सुरू असतानाच ती अचानक कोसळली. विशेष म्हणजे, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने यापूर्वीच ही इमारत असुरक्षित असल्याचे ओळखून ती धोकादायक असल्याचे जाहीर करणारी नोटीस बजावली होती. असे असूनही ही दुर्घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’; शिक्षणमंत्री बदलावर भाजप नेत्याच्या मुलीची टीका
- भाजपमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा?
- तुकाराम मुंढेंचा दणका: थेट हायकोर्टाच्या कँटीनला नोटीस, तर हायकोर्टाने दिले मंत्रालयाची झाडाझडती घेण्याचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












