Share

ठाकरे गटाचे ‘ते’ ६ बंडखोर खासदार दिल्लीतून अचानक गायब; एकनाथ शिंदेंची रणनीती बदलली?

ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार दिल्लीतून अचानक गायब झाले असून शिंदे गटाने त्यांचा पक्षप्रवेश कायदेशीर बाबींमुळे २-३ दिवस लांबणीवर टाकला आहे.

Published On: 

Shinde Faction rebel MPs moving to undisclosed location from Delhi

दिल्ली– ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची जोरदार चर्चा रंगत असतानाच, अचानक रात्रीतून सर्व बंडखोर खासदार गायब झाले असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच एक थरारक हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी बंड पुकारल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. हे बंड मोडून काढण्यासाठी संजय राऊत आणि विनायक राऊत दिल्लीत तळ ठोकून आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ६ पैकी किमान २ खासदार पुन्हा पक्षात परत येतील अशी आशा ठाकरे गटाला अजूनही आहे. पण दुसरीकडे, हे बंडखोर खासदार आता दिल्लीतून अचानक गायब झाले असून त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे.

या संपूर्ण घडामोडींमागे एक मोठी रणनीती असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे (Shinde Faction) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष सध्या ठाकरे गटाकडून येणाऱ्या संभाव्य कायदेशीर आक्षेपांवर बारकाईने काम करत आहे. भविष्यात कोणताही कायदेशीर पेच किंवा तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आधी सर्व कायदेशीर बाजू तपासून घेतल्या जात आहेत.

त्यामुळेच, या सर्व ६ बंडखोर खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश तूर्तास दोन ते तीन दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि ठाकरे गटाच्या चाणक्यनितीला शह देण्यासाठीच या खासदारांना दिल्लीबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे समजते.

सध्या शिंदे गटाने पूर्णपणे ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. ठाकरे गट नेमके काय कायदेशीर डावपेच खेळतोय, हे पाहूनच पुढील पाऊल टाकले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस तरी या बंडाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुरावे समोर आणले जाणार नाहीत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय उलटफेर होणार, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही