Ministry Canteen Inspection : एफडीएने (FDA) यापूर्वी उच्च न्यायालयात (High Court) असा दावा केला होता की मंत्रालयाच्या कँटीनमध्ये (Ministry Canteen) एकही कीटक आढळला नाही. मात्र, कीटक नसल्याचा हा दावा ‘हास्यास्पद’ मानून न्यायालयाने कँटीनची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने मंत्रालय परिसरातील कँटीनची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान दोन्ही कँटीनमध्ये माश्या आढळून (Flies Found) आल्या. या प्रकरणाचा अहवाल लवकरच उच्च न्यायालयात सादर केला जाणार असून, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर यावर सुनावणी होणार आहे.
FDA Ministry Canteen Controversy Flies Found
कीटक नसल्याचा एफडीएचा दावा ‘निरर्थक’ ठरवून फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने ही पाहणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, पाहणीतील निष्कर्षांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कँटीनची पाहणी केली आणि दोन्ही ठिकाणी माश्या आढळल्या. याव्यतिरिक्त, भाजीपाला चिरण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरले जाणारे चाकू जीर्ण आणि गंजलेल्या अवस्थेत असल्याचेही दिसून आले.
न्यायालयात अहवाल सादर होणार
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील कँटीनची पाहणी पूर्ण केली आहे. या पाहणीचा अहवाल आता उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. आता या मुद्द्यावर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा; मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश
- ‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’; शिक्षणमंत्री बदलावर भाजप नेत्याच्या मुलीची टीका
- भाजपमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा?













