डंके की चोटवर सांगतो, एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री नाहीत, शिंदे ‘संकरित राजकारणी’: गुणरत्न सदावर्ते

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खळबळजनक दावा करत, ते येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत असे म्हटले आहे.

Published On: 

Gunratna Sadavarte

प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणाबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर हसत प्रतिक्रिया दिली, मात्र एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम दावा केला. “डंके की चोटवर सांगतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत,” असे थेट विधान सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केले आहे. शिरसाट जे काही म्हणतात ते त्यांचे शिंदेंवरील व्यक्तिगत प्रेम असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नेते ‘ऑरगॅनिक राजकारणी’ वाटतात आणि तीनही नेते ‘रोज फ्लॉवर’सारखे (गुलाबाच्या फुलासारखे) दिसतात. यातून महाराष्ट्राने एक वेगळा आदर्श घेतल्याचे सदावर्ते म्हणाले. महाराष्ट्राला एक सांस्कृतिक ठेवा आहे, मात्र एकनाथ शिंदे यांचे राजकारण हे ‘संकरित राजकारण’ आहे, अशी टीका सदावर्ते यांनी केली. अशा संकरित राजकारणामुळेच राजा हा मंत्री होत असतो. कोणत्याही परिस्थितीत असे संकरित राजकारण नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे राजकारण पाकिस्तानी नसल्याचे सांगत, त्यांच्याशी आपले वैयक्तिक भांडण नसून केवळ काही विषयांवर विरोधी भाष्य करावे लागते, असे स्पष्ट केले.

“आम्ही काही भाजपचे प्रवक्ते नाही, पण उद्धव ठाकरे साहेबांनी उद्याच्या दिवाळीसाठी मुख्यमंत्र्यांना का बोलावू नये?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर मुख्यमंत्र्यांना माझ्या घरी बोलावले, तर त्यांना यावे लागेल आणि उद्धवजींनी बोलावले तर त्यांनाही जावे लागेल.

पूर्णेकर कुटुंबाच्या मुद्द्यावरूनही सदावर्ते यांनी पोलिसांना आवाहन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही हयगय करू नये, असे सांगत यामध्ये कोणीतरी ‘दाढीवाला अजगर’ किंवा डीसीपी अधिकारी असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत यातील लाईन क्लिअर होईल, असेही ते म्हणाले. तसेच, भाजपचे नवनाथ बन हे आमच्या रक्ताचे असून, जर कोणी लायकी काढली तर त्यांना लायकीत राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेवटी, आमदार संजय गायकवाड यांच्यावरही सदावर्ते यांनी जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांबद्दल गायकवाड यांनी केलेले वक्तव्य हे दलबद्रीपणाचे असून ही कोणती विचारधारा आहे, असा सवाल त्यांनी केला. हे सर्व काँग्रेसच्या विचारधारेतून आणि संकरित राजकारणातून येत असल्याची सडकून टीका त्यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही