🕒 1 min read
लग्नानंतर सेलिब्रिटी सहसा परदेशात हनिमूनला जातात किंवा मोठ्या पार्ट्यांमध्ये व्यस्त असतात. पण दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना (Vijay Rashmika) यांनी काहीतरी वेगळंच केलंय, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
नुकतंच या नवदाम्पत्याने तेलंगणातील अचमपेट मंडळातील थुम्मनपेट गावाला भेट दिली. ‘द देवरकोंडा फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी तब्बल १८० होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करत सर्वांची मनं जिंकली आहेत.
Vijay RashmikaThe Deverakonda Foundation
थुम्मनपेट हे गाव निवडण्यामागे एक खास भावनिक किनार आहे. याच गावात विजयच्या वडिलांचा जन्म झाला होता आणि त्यांचं बालपण तिथेच गेलं. त्यामुळेच फेब्रुवारीत लग्नबंधनात अडकल्यानंतर या दोघांनी सर्वात आधी याच गावाला भेट दिली होती.
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. विजयने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत या १८० विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे.
यावेळी रश्मिकाने मंचावर बोलताना स्वतःची ओळख ‘रश्मिका मंदाना देवरकोंडा’ अशी करून दिली. “माझ्या सासऱ्यांच्या गावातून या चांगल्या कामाची सुरुवात करताना मला प्रचंड आनंद होत आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या.
दुसरीकडे, विजयने या कार्यक्रमात भविष्यातील योजनाही स्पष्ट केल्या. ही तर फक्त सुरुवात असून भविष्यात संपूर्ण तेलंगणामध्ये हा उपक्रम राबवण्याचं त्याचं स्वप्न आहे. त्याने आपल्या आई-वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत २०२७ मध्ये पुन्हा भेटण्याचं आश्वासनही दिलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘छावा’मधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल
- बार कौन्सिल निवडणुकीत तरुणाईचा विजय: Adv. ज्ञानेश्वर बागुल ठरले सर्वात तरुण सदस्य
- शहराचे नाव बदलले, मग बँकेचे नाव का नाही? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांचे थेट एमडींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











