लग्नाच्या आठ महिन्यांतच विजय-रश्मिकाच्या घटस्फोटाची चर्चा; इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेटकऱ्यांचे तर्कवितर्क

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

Published On: 

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna divorce rumors on social media

प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. २६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने अलीकडेच ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. मात्र, आता त्यांच्यात सर्व काही आलबेल नसून त्यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या अफवा नेटकऱ्यांमध्ये पसरल्या आहेत.

या चर्चांना उधाण येण्याचे मुख्य कारण म्हणजे विजय देवरकोंडाचे इन्स्टाग्राम अकाउंट. विजय इन्स्टाग्रामवर कोणालाही फॉलो करत नाही. त्याची फॉलोइंग लिस्ट शून्यावर असून, त्याने पत्नी रश्मिकालाही फॉलो केलेले नाही. यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसल्याची आणि हे नाते ‘रेड फ्लॅग’ असल्याची शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. एका युजरने तर थेट “आणखी एक घटस्फोट लोडिंग?” अशी कमेंट करत शंका उपस्थित केली आहे.

सोशल मीडियावर एका युजरने दावा केला की, विजय आणि रश्मिका यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. “धक्कादायक! रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. यामागील खरे कारण काय असू शकते? त्यांच्या नात्यात अडचणी येत असल्याच्या अफवा आहेत,” अशी पोस्ट या युजरने लिहिली. मात्र, या दाव्याला उत्तर देताना दुसऱ्या एका युजरने स्पष्ट केले की, “त्यांनी सुरुवातीपासूनच एकमेकांना फॉलो केलेलेच नव्हते.” तसेच “एकमेकांना अनफॉलो करणे म्हणजे आपोआप अडचण आहे असे नाही,” असेही आणखी एकाने म्हटले आहे.

प्रत्यक्ष इन्स्टाग्राम अकाउंटची पडताळणी केली असता, विजय कोणालाही फॉलो करत नसल्याचे स्पष्ट झाले, तर रश्मिका मात्र आपल्या पतीला फॉलो करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ९’ या चॅट शोमधील विधानांमुळेही हे दोघे चर्चेत आहेत. एका वर्षभरात रश्मिकाने आपल्याला लग्नासाठी “सुमारे १०० वेळा” विनंती केली होती, अशी कबुली विजयने या शोमध्ये दिली होती, ज्यावरून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. रश्मिकानेही या गोष्टीला शोमध्ये दुजोरा दिला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

विजय देवरकोंडाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील फॉलोइंग लिस्ट शून्यावर असून, तो पत्नी रश्मिकालाही फॉलो करत नसल्याचे समोर आल्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही